Skip to main content

थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा




शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा - आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी



सांगली  /विशेष प्रतिंनिधी - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांचे सहकारी,सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड (भाऊ)यांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र च्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. काल 21 जून 2021रोजी पलूस येथे घेण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे भविष्यकालीन धोरण ठरवण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दगडू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रारंभी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन क्रांतिवीर रामचंद्र लाड तथा भाऊ हे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत . त्यामुळे कॅप्टन भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा ठराव करण्यात आला व भाऊंना शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी करण्यात आली.





त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातून आठ महिन्यात 9500 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करून पर्यावरण विषयक जनजागृती करणाऱ्या यवतमाळच्या प्रणाली चिकटेला महाराष्ट्राची ग्रेटा थुनबर्ग या विशेष पुरस्काराने सरकारने सन्मानित करावे अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.प्रणाली चिकटे या पर्यावरणप्रेमी विद्यार्थिनीने सांगली जिल्ह्याच्या प्रवासात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या नावे लावलेल्या वृक्षांनी बहरलेले बलवडी (भा) येथील क्रांती स्मृतीवन व येरळा नदीवरील वाझर बंधारा परिसराला भेट देण्याची विनंती करण्याबाबतचा ठराव या बैठकीत घेण्यात आला. 

ad.


गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव देण्याबाबत लवकरच संघटनेचे धोरण ठरविण्यात येऊन पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.महाराष्ट्राला शूरवीर क्रांतीकारकांची खूप मोठी परंपरा आहे.अशा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्यातील सिंदूर येथील रामोशी बेरड समाजातील क्रांतिकारक वीर सिंदूर लक्ष्मण यांची स्मृती शताब्दी लवकरच सुरू होत असून ती साजरी करण्याबाबत ब्रिगेडने पुढाकार घेण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी पुरोगामी चळवळी सोबतया आठवड्यात बैठक होणार आहे. संघटनेच्या वतीने  आरक्षण, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती ,रोजगार व शिक्षण या विषयावर तज्ञांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 


कोरोना कालावधीत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी सुमारे पंधरा हजार लोकांच्या पर्यंत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.यासाठी स्वत: गोळ्या उपलब्ध करून देऊन सहकार्य करणारे पलूस येथील डाँ.संतोष देसाई दांम्पत्याचा अभिनंदनाचा विशेष ठराव  करण्यात आला.सदर बैठकीला संघटनेचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे, राज्याध्यक्ष दगडू जाधव, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, राज्य संघटक पांडुरंग मदने, लक्ष्मण शिंदे ,राज्य सल्लागार बाळासाहेब खेडकर ,आदित्य माळी ,विनोद आल्हाट,सोशल मीडिया प्रमुख महेश मदने, राज्य उपाध्यक्ष सुनील दलवाई, पलूस शहर शाखेचे संजय जाधव, सोमनाथ जाधव ,गणेश शिरतोडे, रमेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मारूती शिरतोडे यांनी केले तर आभार हिम्मतराव मलमे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...