Skip to main content

लॉकडाउन - सुख ,समाधान आणि निरपेक्ष प्रेम शिकवणारा काळ

 



                                   पाखरांची किलबिलाट, चिमण्यांची चिवचिवाट ऐकून जिथे दिवसाची सुरुवात होत असे. आज तिथे रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने जाग येत आहे.रात्री अपरात्री जेव्हा केव्हा हे आवाज कानावर पडले मनात भीतीचं काहूर माजत . कुठे, कुणाला काही झालं तरी नसेल ना या विचाराने मन भयभीत होऊन जातं होतं. पांढरे निळे पीपीई किट घालून आलेले . ज्यांचे ना डोळे दिसायचे ना चेहेरे असे काही लोक यायचे आणि घरातील व्यक्तींना घेऊन जायचे. काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण असायचा. कोरोना हा संसर्गजन्य आजार पाहता पाहता आपल्या घरा दारा पर्यंत येउन ठेपलाय याची तीव्र जाणीव होऊ लागली. दिवस रात्र रेडिओ, टीव्ही वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या पाहुन मन अधिकच खचायचं.या अशा भयावह वातावरणात सकारात्मक राहणं जणू एक चॅलेंज होतं. पण या सोबतच अश्या ही काही घटना होत्या ; ज्या जगण्याचं बळ देवून जात. कोरोना ने माणसाला माणसापासून जरी दूर केलं असलं तरी , माणुसकी पासून दूर लोटू शकला नाही. या काळात या ना त्या प्रकारे लोकांना गरजूंची,गरिबांची मदत करताना पाहिलंय. देवरूपी माणूसचं ती. अशा बिकट काळातही मदतीचे हात कमी नाही झाले. याची मनोमन धन्यता वाटते.

                                  फ्रंट लाईन वर्कर्स ते डॉक्टर, जीवनावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी ते या काळात होईल व जमेल ती मदत करणारी लोकं ही जणू देवांचीच साक्षात रूपं होती.जीवाची पर्वा न करता लोकांमध्ये जागृती निर्माण करून कोरोना टेस्ट करणारे कर्मचारी असो किंवा काळाचा घाव पडल्याने कोरोना मुळे दगावलेल्या लोकांची दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे सारसावलेले हात.  जीवाची भिती बाजूला सारून त्यांनी माणुसकी जपली.का तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. हे कर्तव्य जसे त्यांचे तसे आपलेही आहे .आपणही समाजाचे देणे लागतोच. आपापल्या परीने जे शक्य ते करावे याच हेतूने  सगळे झटले. होईल ती मदत केली. ही या दुर्दैवी काळातील सुदैवी बाजू म्हणावी लागेल.

                               आणखी सांगायचं झालाच तर,कधी न्हवे ते इतका वेळ आपण एकत्र आपल्या परिवारासोबत घालवत आहोत. या काळात नक्कीच आपण आपल्या आप्त लोकांना समजू लागलो आहोत जाणू लागलो आहोत, एकमेकांची आवड निवड कळू लागली आहे.एका छता खाली कित्येक वर्ष एकत्र राहूनही जे मन जुळले नाहीत ते आता जुळत आहेत.आई बाबा भाऊ बहीण या सोबत वेळ घालवून आपण जणू एकमेकांना भावनिक समाधान भावनिक आसरा देत आहोत. प्रत्येक गोष्ट,घडणारी घटना ही आपल्या सोबत एक वाईट तर एक चांगली बाजू नक्कीच घेऊन येते.याची प्रचिती या टाळेबंदीत येत राहिली.

                                 


   


           या काळात स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहेच कारण कोरोना वर कोणतंही एक  अस रामबाण औषध आणखी आलेलं नाही. ज्या लसी,औषधं आलेली आहेत त्या फक्त आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहेत. जे आपल्याला कोरोना विरुद्ध युद्ध लढण्यास ताकदीने मदत करतील. त्यामुळे काळजी घेणं हेच यावरच महत्वाचं आणि मारक उपाय आहे.

                      म्हणूनच या काळात जनजागृती करण मला महत्वाचं वाटलं आणी मी ते आपल्या स्तरावर करत आहे. लसीकरणा बद्दल , कोरोना बद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफ़वा या दूर करण, समाज प्रबोधन करण हे आपलं ही कर्तव्य आहे असं समजून जर आपण काम केलं तर हा वाईट  कालावधी ही आपण तरुण जाऊ शकू.कमीतकमी नुकसान सोसून आपण यातून नक्कीच बाहेर येऊ. आणि पुन्हा एकदा या खुल्या आसमंता खाली मोकळा श्वास घेऊ शकू.


                          हा काळ व हा मिळणारा वेळ आपण सत्कारणी लावू शकतो, ही वेळ खरी आत्मपरिक्षणाची आहे.कोरोना सारख्या अति सूक्ष्म पण  महाकाय अश्या विषाणू ला हरवण्यासाठी औषधां सोबतच गरज आहे ती सकारात्मकतेच्या ताकदीची.जर ती मिळाली तर हे अदृश्य अस युद्ध आपण जिंकू शकू यात तिळमात्र शंका नाही. कारण घाबरून जाऊन हतबल होऊन जीव सोडताना या काळात खूप जणांना पाहिलं. यातून इतकंच कळलं की लढण्या साठी मनाचं निरोगी राहणं खुप महत्वाचं आहे. या निरोगी मन निर्मिती साठी स्वतःशी सवांद साधा स्वतःशी बोला. ह्या मिळालेल्या वेळेचा सदुयोग करा. मी सुद्धा या वेळेत जे कधी जमलं नाही वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे.ते सर्व करण्याचां पर्यन्त केला. बझील चे प्रख्यात लेखक कोहेलो पाओलो ह्याच जगभर गाजलेलं "द अलकेमिस्ट" हे पुस्तक वाचून काढलं.अशी अनेक पुस्तकं घरी असून ही मला वाचता आलेली न्हवती.ती सर्व वाचून काढली. गाणी कविता लिहायची सवय तर होतीच पण यावेळी मी ती लिहिली ही आणि स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून ही पाहिली व ऐकली. हा अनुभव छान होता वेगळा होता.एकदा असच कपाट आवरत असताना लक्षात आलं की खूप काही असे कपडे आहेत जे कित्येक वर्षांपासून वापरात आलेले नाहीत.ते कपडे घेतले व गरजू ना ते दिले.कोरोना काळात असे कोणते ही काम करा ज्याने मन शांत व प्रसन्न होईल.अशी अनेक काम या गेल्या दीड वर्षात केली.निस्वार्थ भावनेने केलेलं कोणतही काम मनाला समाधान नक्कीच देत.व त्यामुळे पुढच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आलेलं ते स्मित हास्य म्हणजे एक औषध च ठरतं आपल्या आंतर मनातील जखमेसाठी. जेव्हा आपण दुसऱ्याला काही तरी देतो, कुणासाठी तरी काजी मनापासून परताव्याची अपेक्षा न करता काही तरी करतो तेव्हा आपल्या ला ही काही न काही नक्कीच मिळत असतं.

अदृश्य अस, सुख, समाधान  आणि निरपेक्ष प्रेम.

हेच या कोरोना काळान शिकवलं.

                                                                              लेखन  - शहजोया , पत्रकारितेची विद्यार्थिनी   

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...