Skip to main content

आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप




सोलापूर /विशेष प्रतींनिधी - सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले गटनेते चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे हे उपस्थित होते.

यानंतर माननीय आमदार यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची त्यांच्या कार्यालयात तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सीओ श्री.दिलीप स्वामी यांची देखील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

आमदार लाड यांच्या वतीने जूळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी येथील शासकीय क्वारंटाइन सेंटर मधील महिला डॉक्टर तसेच रुग्णसेवक यांना १०० PPE कीट प्रदान करण्यात आले.यावेळी मनपा उपायुक्त धनराज पांडे, मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, डॉ. पल्लेलू हे प्रमुख उपस्थित होते.

यानंतर प्रभाग 21 मध्ये दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार अरुण लाड यांच्या निधीतून त्यांच्या हस्ते १०० गरजू गरीब महिलांना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर पक्ष पदाधिकारी यांच्या समवेत स्थानिक नगरसेवक तौफिक शेख, इरफान शेख हे देखील उपस्थित होते. अन्न धान्य वाटप नंतर आमदार अरुण लाड यांनी पदवीधर निवडणुकीत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल AIMIM चे नगरसेवक तौफिक शेख यांच्या नई जिंदगी भागातील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व आमदारांचा स्वागत सत्कार केला.

दौऱ्याची सांगता करताना आमदार अरुण लाड यांनी सोलापूरची आंतरराष्ट्रीय कराटेपटू कु.भुवनेश्वरी जाधव हिच्या शिवस्मारक येथील कराटे प्रशिक्षण वर्गाला सदिच्छा भेट देऊन तिने मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल तिचा सत्कार केला व तिच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण वर्गात राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले बाबत तिचे विशेष कौतुक करत तिच्या भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी भुनेश्वरी चे वडील स्व.सुरेश जाधव यांच्या जडणघडणीच्या विशेष आठवणी सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वरीने आंतरराष्ट्रीय कीर्तीमान मिळविल्याचे सांगितले. आमदार अरुण लाड यांनी देखील प्रशिक्षण वर्गात उपस्थित खेळाडूंचे मनोधैर्य सुचविताना होणे यासारखे आंतरराष्ट्रीय ख्याती तुम्हीपण मिळवा असे सांगत मुलांना प्रोत्साहित केले व जास्तीत जास्त मैदानी खेळांकडे लक्ष द्या, तब्येत सांभाळा, आरोग्य उत्तम ठेवा असा मोलाचा सल्ला दिला.

आमदार अरुण लाड यांच्या आजच्या शहराच्या पूर्ण दौऱ्याचे नियोजन शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांनी केले होते. याकामी त्यांना सोमनाथ शिंदे ज्योतिबा गुंड रुपेश भोसले तनवीर गुलजार प्रमोद भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...