Skip to main content

म्युकर मायकोसिस बुरशींचा कर्दनकाळ ठरताहेत 'या' गोळ्या


सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या उपचार संशोधनातील निष्कर्ष



बार्शी : देश कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा जास्त संसर्गजन्य असलेल्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच पोस्ट कोविड रुग्णांमध्ये वाढत असलेल्या म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे त्रस्त झालेला आहे. म्युकर मायकोसिस ची राज्यात ७००० पेक्षा वाढलेली रुग्णसंख्या,९% हून अधिक पोहोचलेला मृत्यूदर व खूप महागडी आणि जास्त कालावधीची उपचार पद्धती अशा भयग्रस्त वातावरणात एक अत्यन्त सकारात्मक बातमी समोर आली असून ती म्हणजे बार्शी सारख्या ग्रामीण भागातून, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासिका सौ अमृता शेटे मांडे यांनी म्युकर मायकोसिस च्या उपचार पद्धतीवर केलेल्या संशोधनाची. संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष उपचार पद्धतीला पर्याय उपलब्ध करून देणारे असल्याने म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा देऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील असा विश्वास डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे 


म्युकर मायकोसिस हा रोग फक्त काळ्या बुरशी चा म्हणण्या पुरता राहिला नसून पांढरी, पिवळी व आता हिरवी बुरशीही रुग्णाला हानी पोहचविण्यासाठी कारणीभूत ठरू पहात आहे.साथीच्या काळातील रोगजंतू हे वेगळ्या प्रकारचे अर्थात व्हेरिएंट चे असू शकतात ,त्यामुळे आधी पासून वापरात असलेली औषधे या जंतूंना मारण्यासाठी यावेळीही तितकिच प्रभावी ठरतील याची खात्री देता येत नाही .म्हणूनच अस्तित्वात असलेल्या औषधांची परिणामकारकता तपासणे गरजेचे असते.फंगल इन्फेक्शन पासून झालेल्या व्याधीतून मिळालेल्या क्लिनिकल  सॅम्पलमधिल नेमकी  बुरशी  शोधून ,वेगळी करून वाढवावी लागते व नंतर अँटिबायोटिक सेन्सिटिव्हीटी टेस्ट करणे उचित ठरते. अँटिबायोटिक बऱ्याच कालावधी साठी घेणे असल्याने प्रभावी अँटिबायोटिक शोधणे याला फार महत्व आहे.



आम्ही केलेल्या प्रयोगात फ्लूकानाझोल, इट्रकोनाझोल,टेरीबिनाफिन हायड्रोक्लोराइड,ग्रीसोफुलविन हे   स्वतंत्र चार केमिकल्स असलेल्या  आठ ब्रँडच्या गोळ्या तसेच केटोकोनाझोल  व ल्युलिकोनाझोल हे स्वतंत्र दोन केमिकल्स असलेले दोन ब्रँडचे  मलम यांची  म्युकर मायकोसिसच्या बुरशींचा नाश करण्याच्या क्षमतेची अँटिबायोटिक  सेनसिटीव्हीटी टेस्ट करून तपासणी केली असता टेरीबिनाफिन हायड्रोक्लोराइड व ग्रीसो फुलविन हे केमिकल असलेल्या गोळ्या म्युकर मायकोसिस या रोगावर सर्वात जास्त प्रभावी व फ्लूकोनाझोल हे   केमिकल असलेल्या गोळ्या मध्यम प्रभावी आढळलेल्या असून   केटोकोनाझोल  हे केमिकल्स असलेले  मलम खूपच उपयुक्त असल्याचे सौ अमृता शेटे मांडे यांनी सांगितले



म्युकर मायकोसिस रोगात बुरशी मुळे झालेले ब्लॉकेज ऑपरेशन करून काढणे अपरिहार्य असून नंतर  प्रभावी असे एम्फोटेरेसीन हे इंजेक्शन वापरले जाते.प्रत्येक रुग्णाला रोज सहा इंजेक्शन याप्रमाणे १५ ते २५ दिवस या इंजेक्शन ची गरज असते. परंतु या इंजेक्शन ची निर्मिती, पुरवठा,उपलब्धता व गरज यामध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे.जर काही कारणामुळे इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तर प्रभावी ठरलेल्या गोळ्या देणे क्रमप्राप्त असते त्यामुळे आम्ही केलेल्या प्रयोगात उपयुक्तता सिद्ध झालेल्या गोळ्यांचा वापर इंजेक्शन उपलब्ध होईपर्यंत त्वरित पर्याय म्हणून वापरल्यास रुग्णांना फार मोठा दिलासा मिळू शकतो असे डॉ सुहास  कुलकर्णी यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...