Skip to main content

सरपंचांनी दिली कोरोना रुग्णांसाठी मोफत गाडी , संघटनेने केला सत्कार

 



सरपंच परिषद राज्यातील सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील - अँड विकास जाधव प्रदेश सरचिटणीस   
 


बार्शी/प्रतिनिधी - सरपंच परिषद  महाराष्ट्र यांच्या वतीने सरपंच परिषदेचे सरचिटणीस अँड विकास जाधव यांच्या हस्ते   तसेच रस्तापुरचे सरपंच दादासाहेब बरबडे,उंबर्गेचे सरपंच दादासाहेब विधाते यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील मांडेगाव ग्रामपंचायत मध्ये जाऊन मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे यांना कोरोनाच्या काळात स्वतःची गाडी कोरोना रुग्णासाठी मोफत रुग्णवाहिका म्हणून दिल्या बद्दल तसेच मागील वर्षी पासून कोरोनाचा गावात सिरकाव होवू नये म्हणून अतिशय प्रभावी काम केले होते ग्रामविकासात नाविण्यपूर्व व यशस्वी कार्यबदल  आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ग्रामसेवक प्रमोद बाबर,ग्रा, सदस्य बंडू  दळवी,तानाजी मिरगणे, विष्णु मिरगणे यांचा सह ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच परिषद प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष अनिल गिते, सरचिटणीस अँड विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरपंचाचा मानसन्मान वाढवण्यासाठी तसेच आदर्श निर्माण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरपंच परिषद राज्यात काम करत आहे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदिनाथ देशमुख महिला जिल्हा अध्यक्ष कविता घोडके पाटील यांनी बार्शी तालुक्यातील आदर्श सरपंच म्हणून पंडित मिरगणे यांची निवड केली कोरोना प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे  गावात जावून मोजक्या पदाधिकार्याच्या उपस्थितीत सदरील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अशाचप्रकारे सर्व तालुक्यातील एक आदर्श सरपंच निवड करण्यात येईल असे सरचिटणीस अँड विकास जाधव यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...