बार्शीतील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन,
रेमडीसिव्हिर इंजेक्शन वाढवून द्या –भाकप
निवेदनात म्हणले आहे,
बार्शी तालूका हा उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयातील काही
तालूक्यांच्या जवळचा आहे. बार्शीत दवाखान्याची संख्या
जास्त आहे. त्यामूळे सर्वच ठिकाणचे रुग्ण येथे येतात . बार्शी तालूक्यातील वाढणारे
कोरोनाचे रुग्ण व बाहेरील रुग्ण असा दुहेरी ताण आहे. बार्शीत
मृतांची संख्या देखील जास्त आहे. अशा परस्थितीत बार्शी तालूक्याचे लोकप्रतिनीधी
मा. आमदार यांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडीसिव्हिर इंजेक्शन व कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस
वाढवून मिळणे गरजेचे झाले, असल्याच्या मुद्या उपस्थित केला
होता. त्या मुद्यांचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष समर्थन करतो .
बार्शी तालूक्या साठी तातडीने ऑक्सिजन साठा, रेमडीसिव्हिर इंजेक्शनचा कोटा व कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस
यांचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे.
कोरोना लसीकरणाच्या ठिकाणी गैरसोय
होत असल्याने एक लस घेण्यासाठी तीनठिकाणी नोंदणी करावी लागत आहे. यामुळे लसीकरणावेळी गर्दी व गोंधळाचे वातावरण तयार
होते आहे. यावर तातडीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात ही मागणी देखील केली आहे.

Comments
Post a Comment