Skip to main content

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक

 


                                                                                                                                                                                                         दिल्ली /वृत्तसंस्था
-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या मुलाचे गुरुवारी सकाळी निधन झाले. आपल्या मुलाचे निधन झाल्याची बातमी त्यांनी ट्विटरद्वारे दिली. ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की आशिष येचूरी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर,  परिचारिका व स्वच्छता कर्मचारी आणि इतर असंख्य लोक जे  आमच्या पाठीशी होते . त्या सगळ्यांचा मी आभारी आहे.


34 वर्षीय आशिष येचुरी पेशाने पत्रकार होते. दिल्लीतील  गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.आशिष यांनी एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम चेन्नई येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये टाइम्स ऑफ इंडिया व तसेच अनेक माध्यमांमध्ये काम केले होते .                                                                                            

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो ने आशिषच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माकपाचे राज्य सचिव आडम मास्तर, किसान सभा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे समवेत अनेक नेत्यांनी आशिष यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे तिला समजल की ती स्वतःच त्यातून बाहेर पडेल

                                                                                             आज जागतिक मासिक पाळी दिन... सकाळी सकाळीच घरातीलच एक किस्सा आठवला. सध्या लॉकडाउनमुळे घरा घरात पापड्या कुरवडया बनवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत... तसाच कार्यक्रम काही दिवसांपूर्वी आमच्याही घरी चालू होता. घरात मासिक पाळी येणाऱ्या आम्ही तिघी. आई ,वहिनी आणि मी. त्यातही आईची पिशवी काढून टाकल्याने राहिलो आम्ही दोघीच वहिनी आणि मी... घरात एकीचे झाले  की एकीचे चक्र सुरू असते. त्यामुळे एकदा अशीच मजा घरात घडली. गेल्या महिन्यात आईने घरात कुरवडया बनविण्याचा घाट घातला, त्याही दोन टप्यात. पहिल्या टप्प्यातल्या कुरवड्या व्यवस्थित झाल्या अगदी कोणत्याही अडचणी व तक्रारीशिवाय . परंतु दुसऱ्या टप्प्यात मात्र आमच्या वहिनीबाईंची पाळी होती. त्यादिवशी सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि दत्ता द...