Skip to main content

भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

 



३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक).


आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों कुटुंब या व्यवसायात कार्यरत असून कित्येक कोट्यावधींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनी सुद्धा ही कोटींची उड्डाणे पूर्ण केली आहेत, त्यावरूनच या व्यवसायाची महती कळते.


भारतीय चित्रपट मुर्हूतमेढ


मुंबईच्या सँडहर्स्टरोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. दादासाहेबांसह अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पाहात होते. मात्र चित्रपट पाहतांना दादासाहेबांच्या मनात वेगळ्याच विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पाहिला आणि याच ठिकाणी चित्रपट निर्मितीची ठिणगी पेटली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पर्वाची सुरूवात झाली.


मराठी माणूस एकदा मनात आले की, मग काहीही होवो मागे हटणार नाही.. वयाच्या ४० व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अभ्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. प्रख्यात नेत्र विशारद डॉ. प्रभाकर यांनी दादासाहेबांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. सावधानतेचा इशारा दिला पण त्याचीही पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेंनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेतले. त्यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली. लंडन येथे त्यांची भेट बायोस्कोप सिने विकली या सिने साप्ताहिकाच्या संपादकांशी मि. केपबर्न  यांच्याशी झाली. त्यांना दादासाहेबांनी लंडन येथे येण्यामागील हेतू स्पष्ट केला. त्यावर यात पडू नका, इंग्लंडचे काही निर्मातेही अयशस्वी ठरले आहेत. शिवाय भारतात चित्रपटाची फिल्म ठेवण्यासाठी योग्य हवामान नाही असाही सल्ला केपबर्न यांनी दिला. त्यावर दादासाहेबांनी आपल्या अभ्यासाच्या आधारे प्रतिकूल मुद्दे खोडून अनुकूल मुद्दे मांडले व केपबर्न यांना प्रभावित केले. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले.


राजा हरिश्चंद्र : निर्मिती


राजा हरिश्चंद्र हा एक तासाचा चित्रपट तयार होण्यास आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका दादासाहेबांनी स्वत: केली तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलावंताने साकारली. राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र यांनी केली होती. कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळविला आणि भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर दादासाहेबांनी आपला स्टुडिओ नाशिक येथे स्थलांतरीत केला. त्या ठिकाणी मोहिनी भस्मासूर व सावित्री सत्यवान हे चित्रपट निर्माण केले. चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच आणखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच चित्रपटांच्या प्रिंट काढणाऱ्या मशिनरीची त्यांना गरज भासू लागली. यासाठी १ ऑगस्ट १९१४ रोजी दादासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले. ४ ऑगस्टपासून दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे अडचणी वाढल्या फारसे पदरात न पडता दादासाहेबांना रिक्त हस्ताने परत यावे लागले.


विक्रमी कलाकृती


दादासाहेबांची चित्रपटनिर्मिती सुरूच होती. त्यांनी १९१७ मध्ये लंकादहन या चित्रपटाची निर्मिती केली. लंकादहनने त्या काळातील चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. मद्रास येथे या चित्रपटाच्या तिकीटविक्रीची जमा झालेली चिल्लर पोत्यात भरून बैलगाडीतून पोलीस बंदोबस्तात न्यावी लागली.


तद्नंतर त्यांनी How Films are made (१९१७), श्रीकृष्ण जन्म (१९१८), कालिया मर्दन (१९१९), भक्त प्रल्हाद (१९२०) हे अविस्मरणीय चित्रपट निर्माण केले. दरम्यान मूक चित्रपटांचा जमाना संपून बोलपटाचे युग सुरू झाले होते. १९३२ मध्ये बोलपटाचा जमाना आला. दादासाहेबांनी सेतुबंधन या मूकपटाचे डबिंग करुन तो बोलपट बनवला. पुढे कोल्हापूर सिनेटोन कंपनीसाठी दादासाहेबांनी  १९३७ मध्ये गंगावतरण हा चित्रपट दिग्दर्शित केला.  हाच चित्रपट दादासाहेबांचा शेवटचा चित्रपट ठरला.


चित्रपट कारकिर्द


फाळके यांनी ५२ मूकपट,  गंगावतरण  बोलपट, अनुबोधपटांबरोबर ३० लघुपटांची निर्मीती केली. ३ मे १९१३ रोजी मुंबई च्या कॉरनेशन चित्रपटगृहात  "राजा हरिश्चंद्र" चित्रपट प्रदर्शित झाला आणि दादासाहेबांचे नाव जागतिक पातळीवर "भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक" म्हणून नोंदविले गेले.


दादासाहेबांचा अंतिम काळ मात्र कष्टदायक गेला. १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे फाळके युगाचा अस्त झाला. दादासाहेब फाळके यांचे स्मारक नाशिक येथे आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव येथे मोठ्या दिमाखाने उभी आहे. या ठिकाणी त्यांचा एक सुरेख पूर्णाकृती पुतळा देखील आहे. भारतीय पोस्ट विभागाने दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ तिकिट देखील काढले आहे.


फाळके पुरस्कार विजेते


दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने दादासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन १९६९ पासून सुरू केला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी देविका राणी ठरल्या. तर नुकताच अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.


चित्रपटसृष्टीतील पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराब मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही.शांताराम, राज कपूर, एल.व्ही.प्रसाद, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भुपेन हजारिका, मजरुह सुलतानपूरी, गीतकार प्रदिप, डॉ.राजकुमार, दादामुनी अशोक कुमार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीप कुमार, शिवाजी गणेशन, बी.आर.चोप्रा, यश चोप्रा, देव आनंद, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, बी.एन.सिरचार, पंकज मालिक, बी.एन.रेड्डी, धिरेंद्रनाथ गांगुली, काननदेवी, रायचंद बोराट, बी.नागी रेड्डी, आशा भोसले, जयराज, ए.नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्ना डे, व्ही.के.मुर्ती, डी.रामा नायडू, के.बालचंदर, शशी कपूर व गीतकार गुलजार, सौमित्र चटर्जी, मनोज कुमार, प्राण, के. विश्वनाथ, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आदी विभूतींना हा पुरस्कार मिळाला आहे.


000


- डॉ.राजू पाटोदकर, विभागीय संपर्क अधिकारी, मुंबई

(संदर्भ : महाराष्ट्राचे शिल्पकार दादासाहेब फाळके. लेखक बापू वाटवे

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...