Skip to main content

रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करुन द्यावे - उच्च न्यायालयाकडे मागणी

 


राज्य शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन औषध उत्पादक कंपनीचा साठा जप्त करुन रुग्णांना द्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत 



 बार्शी/प्रतिनिधी - जिवन जगण्याच्या अधिकाराचे रक्षण होणे कामी महाराष्ट्र शासनास राज्यातील रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन उप्लब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारे पत्र मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल यांना मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,आण्णा जोगदंड व मनीष देशपांडे यांच्या वतीने पाठविण्यात आले आहे. 

 

सदर पत्रालाच जनहित याचिका समजून मा.उच्च न्यायालयाने पुढील मागणी संदर्भात योग्य ते न्यायाचे आदेश करावेत अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या कोरोना या रोगाने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या दैनंदिन वाढतच आहे.यावर उपचाराकरीता आवश्यक असलेले रेमडेसिवीर हे इंजेक्शन घेण्यासाठी वांवनु फिरावे लागत आहे तरी ते मिळत नाही. हे रेमडेसिवीर  इंजेक्शन न मिळाल्या कारणाने अनेकांचे जीव गेले आहेत. 


सध्या हे इंजेक्शन आवश्यक असून ही मिळत नाही. त्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत आहे. यामुळे गरीब गरजू नागरिकांना सदर इंजेक्शन न मिळाल्याने मृत्यू घडत आहेत. नागरिकांच्या जिविताचे रक्षण व मागेल त्याला आरोग्य सुविधा देणे हे राज्याचे कर्तव्य असताना ही ते राज्याकडून पार पाडले जात नाही. 


 काळाबाजार रोखण्याकरीता उपायोजना केली जात नाही.   म्हणुन  मुख्य न्यायाधीश मुंबई  उच्च न्यायालयाने नागरीकांच्या  जिवितचे रक्षण करण्याकरीता राज्याने   लोकांना रेमडेसिवीर हे इंजेक्शन त्वरीत राज्यातील प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याचे आदेश करावेत. नागरीकांच्या जिवन जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करावे. तसेच सदर रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याकरीता कठोर उपायोजना करुन या औषध उत्पादक कंपनीकडील साठा राज्यशासनाने ताब्यात घेण्याचे आदेश करावेत अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. अशी माहिती मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे महाराष्ट्र सचिव मनिष देशपांडे व संचालक आण्णा जोगदंड यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...