Skip to main content

संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना



बार्शी: बार्शी तालुक्यातील सर्व संशयित व्यक्तींना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.बार्शी तालुक्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. शंभरकर यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली.

बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार डी.एस.कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, तालुका समन्वयक तथा सहायक निबंधक अभय कटके, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.शितल बोपलकर,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, आदी उपस्थित होते.श्री.शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांची त्याच दिवशी तपासणी करावी. अतिजोखमींच्या संपर्कातील आणि कमी जोखमींच्या संपर्कातील किमान वीस व्यक्तींचे ट्रेसिंग करा.
नागरिकांचे सर्व्हेक्षण करा. त्यातून आयएलआय (इन्फ्लूएंजा लाईक इलनेस) आणि सारीची (सिव्हीअर ॲक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) लक्षणे असणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी करा. त्यामध्ये संशयित आढळणाऱ्या व्यक्तींना होम क्वॉरंटाईन न करता इन्टिट्यूशनल क्वारंटाईनवर भर द्यावा. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अधिकाऱ्यांनी परस्परात सुसंवाद ठेवावा. कोणत्याही यंत्रणेला मनुष्यबळ अथवा साधनसामग्रीची आवश्यकता भासल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी दर दोन दिवसांनी आढावा बैठक घ्यावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.
श्री.शंभरकर यांनी जामगांव येथे भेट देवून जामगावचे सरपंच शुभांगी आवटे, उपसरपंच बालाजी गडदे, ग्रामसेवक रणजित माळवे आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. तसेच कंटेन्मेंट झोनला भेट दिली.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...