अक्कलकोट / जयकुमार सोनकांबळे : महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ९६.४३ टक्क इतका लागला आहे.श्री शहाजी प्रशालेची अनुराधा माधव कुलकर्णी ही ९७.६० टक्के गुण मिळवत तालुक्यातुन प्रथम आली आहे तर एस.एस.शेळके प्रशालेतील विश्वनाथ खिरानंद धड्डे यांने ९७ टक्के गुण मिळवत कन्नड माध्यमात प्रथम व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविले.तर मंगरूळे प्रशालेतील सोमनाथ मारूती जमादार यांने ९६ टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविले.या वर्षी तालुक्यातून ४ हजार २९१ मुले व मुली परिक्षस बसल्या होत्या.त्यामध्ये ४ हजार १३८ मुले व मुलींना यश मिळाले आहे.त्यामध्ये मुलींचे प्रमाण उत्तीर्ण होण्याचे अधिक आहे.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment