Skip to main content

आशा सेविका व आशा गट प्रवर्तकच्या मानधनात वाढ - रणसंग्रामच्या निवेदनाची घेतली दखल


रणसंग्राम फाऊंडेशन च्या लक्षवेधी निवेदनाची सरकारने घेतली दखल ; कुंडल येथील आशा सेविकांनी मानले अजितदादांचे आभार.

सांगली - जेष्ठ समाजसेविका अँड. मनिषा रोटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कुंडल ता. पलुस येथील रणसंग्राम फाऊंडेशन तसेच ज्ञानदर्शन वार्ता व्दारा राज्यभरातील आशा सेविका यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 7 वा वेतन आयोगानुसार मानधन मिळणेबाबत लक्षवेधी निवेदन ई मेल व्दारा पाठविण्यात आले. या लक्षवेधी निवेदनाचा पाठपुरावा राज्यभरातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध संघटनांनी करत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन मागण्यांचे गा-हाणे दिले होते. या निवेदनाची दखल घेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा कर्मचारी यांना 2000  व आशा गतप्रवतक  याना 3000 रुपय मानधन वाढ देण्यात आली.या निर्णयानंतर कुंडल येथे अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यांनी साखर वाटत आनंद साजरा केला.

रणसंग्राम फाऊंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे की,  जगभरात आणि देशात, आपल्या महाराष्ट्राला कोरोनाच्या महामारीचा प्रचंड मोठा विळखा बसला आहे. सरकारने दिलेल्या सर्व प्रशासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी प्रशासनाचे मुख्य घटक पोलीस दल आणि आरोग्य प्रशासन, सामान्य प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना पार्श्वभमीवर अहोरात्र राबणा-या आपल्या या प्रशासकीय यंत्रणांतील पोलीस आणि आरोग्य सेवकांना सुरक्षा कवच म्हणुन 25 ते 50 लाखांची विमा सुरक्षा आपण देवुन या कोव्हीड योध्दयांचे मनोधैर्य वाढवले मात्र कोव्हीड योध्दा म्हणुन ज्यांचा सन्मान आपण केलात त्या आशावर्कर आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणुन सेवा बजावणा-या महिला सेवकांना प्रशासकीय सेवा सुविधांची अपेक्षा आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्तव्य बजावणा-या या रणरागिणीं आशासेविकांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या लाजीरवाण्या घटना घडून गेल्या. प्राणघातक हल्ले, कुटूंबाचा विरोध आणि समाजातील विविध घटकांकडून मिळणारी लज्जास्पद- अपमानास्पद वागणुक या सर्वांना फाट्यावर मारून या सावित्रीच्या लेकी कोरोना विरोधी लढ्यात युध्दपातळीवर कर्तव्य बजावत आहेत., आणि आपल्या सरकारकडून या लढवैय्या रणरागिणींची उपेक्षा होत असुन या सर्व महिलां न्याय मागण्यांच्या प्रतिक्षेत आहेत. लक्षवेधी निवेदनाव्दारे ... कोरोनाच्या लढाईत जीव तळहातावर घेऊन तुटपुंज्या मानधनात राबणा-या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना कोव्हीड योध्दा अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या 7 व्या वेतन आयोगाच्या सेवा शर्तीने मानधन तथा पगारवाढ मिळणेबाबत आपणांस मागणी करण्यात येत आहे. आपण आणि आपणच या लक्षवेधी मागण्यांना न्याय द्यावा. या निवेदनाची दखल घेऊन सरकारने आशासेविकांच्या आयुष्यात नवचेतना दिली असल्याचे मत महिला वर्गातून व्यक्त होत आहे.



रणसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक लाड म्हणाले, जेष्ठ समाजसेविका अँड. मनिषा रोटे (माई) यांच्या कुशल मार्गदर्शनासाठी तसेच
ज्ञानदर्शन वार्ता चे संपादक दत्ताभाऊ पाटील, शिवाजी रावळ यांच्या सहकार्याने राज्यभरातील आशा सेविका - गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका - मदतनीसांच्या सर्व संघटना यांना सोबत घेऊन आशा सेविका, अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाही मार्गाने ही चळवळ सक्षमपणे उभा करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...