Skip to main content

तासाभरात मिळतोय प्रवासाठीचा ई-पास ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

\


सोलापूर : कोरोना विषाणूच्या काळात सोलापुरात अडकून पडलेल्या मजूर, गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पास काढावा लागतो. पूर्वी चार-पाच दिवस लागणारा कालावधी आता एका तासावर आला असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरदिवशी दोन ते अडीच हजार अर्ज प्राप्त होत असून 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          लॉकडाऊनमुळे सोलापूर ग्रामीण भागात अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक, भाविक आणि नोकरदार यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी 1 मे 2020 पासून ऑनलाईन ई-पास दिला जात आहे.
          ई-पासविषयी अधिक माहिती देताना उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मोहिनी चव्हाण यांनी सांगितले की, आज 23 जून 2020 दुपारी 12 वाजेपर्यंत ग्रामीण भागात एक लाख 29 हजार 880 अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आले आहेत. 1 लाख 11 हजार 731 अर्जांना मंजुरी दिली असून 17 हजार 478 अर्ज नाकारले आहेत. मंजूर अर्जामध्ये सुमारे 97 हजार अर्ज हे सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तर 16 हजार परवानग्या ह्या परराज्यात जाण्यासाठी देण्यात आल्या आहेत. 671 प्रलंबित अर्ज हे आज मंजूर होतील.
मजुरांना रेल्वेबरोबर एसटीचाही आधार
          परराज्यातील मजूर जिल्ह्यात अडकून पडले होते. सामाजिक संस्थांच्या मदतीने सर्व मजुरांना एकत्र करणे, त्यांची संपूर्ण माहिती संकलन करणे, अन्न-पाण्याची व्यवस्था करून गट करण्यात आले होते. परराज्यांची परवानगी मिळाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 845 मजूर 9 रेल्वेगाड्यांद्वारे आपापल्या राज्यात पाठविण्यात आले. एसटीने (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) 1478 मजूरही रवाना करण्यात आल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
आदिवासी बांधवांना ऑफलाईनचा आधार
          नंदूरबार, रायगड या भागातील 461 आदिवासी बांधव जिल्ह्यात अडकून पडले होते. विशेष बाब म्हणून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ऑफलाईन परवानगी दिली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे असलेल्या याद्यामधून 461 आदिवासी बांधवांना परवानगी देण्यात आली. शिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठीही ऑफलाईनची मदत घेण्यात येऊन 8 हजार 701 नागरिकांना परवानगी देण्यात आली.
असा करा अर्ज
          रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने विकसित केलेल्या www.covid19.mhpolice.in या वेबसाईटवरून ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. संबंधित व्यक्तीला प्रवासाचे कारण, प्रवास कोठून कुठे करणार, प्रवासाची व परतीची तारीख, सहप्रवासी संख्या, नावे, वाहन क्रमांक आदी माहिती भरावी लागते. याशिवाय अर्जदाराचे छायाचित्र, कशासाठी पाहिजे त्याचा पुरावा, ओळखपत्र किंवा कोविड-19 ची लक्षणे नसल्याचा वैद्यकीय दाखला जोडावा. परिपूर्ण अर्जाला तत्काळ परवानगी देऊन ई-पास ऑनलाईन उपलब्ध करून दिला जातो.
कसे चालते कामकाज
          हे कार्यालय सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत संपूर्ण आठवडाभर सुरू आहे. एका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक, संगणक चालक व इतर कर्मचारी कामकाज पाहतात. दोन कर्मचारी हे दूरध्वनी (0217-2731007) आणि समक्ष नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. आलेल्या ऑनलाईन अर्जावर प्रक्रिया करून योग्य कारणे असतील, सर्व पुरावे जोडले असतील तर वेबसाईटची अडचण दूर झाल्याने तत्काळ परवानगी दिली जात आहे. आता इतर जिल्ह्याचा ना हरकत परवाना लागत नसल्याने कामाची गती वाढली आहे.
तातडीसाठी केव्हाही उपलब्ध
          कार्यालय सकाळी 8 ते रात्री 8 असे चालू असले तरी काहीवेळा तातडीचे वैद्यकीय कारण असते किंवा जवळच्या नातेवाईकाचे निधन होते. अशावेळी तत्काळ समन्वय साधून विशेष बाब म्हणून मध्यरात्री किंवा पहाटेही ई-पासची परवानगी दिल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
                                      

--

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...