Skip to main content

पीक कर्जाने दिली नवी आशा!


शहादा तालुक्यात मौजे कुसुमवाडीच्या आदिवासी महिला कनीबाई सांबरसिंग ठाकरे यांना जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या पीक कर्ज मेळाव्यात 1 लाख 14 हजाराचे कर्ज अवघ्या तीन तासात मंजूर करण्यात आले.
पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनादेखील मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सेन्ट्रल बँकेने आयोजित केलेल्या मेळाव्याची माहिती तलाठी राजेंद्र रोकडे यांनी कोतवालामार्फत कुसुमवाडीत पोहोचविली. कनीबाई यांना घरपोच माहिती मिळणे हा सुखद धक्का होता.

कनीबाई या 66 वर्षाच्या विधवा आहेत. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी भावाच्या मुलाला काही वर्षापूर्वी दत्तक घेतले. स्वत:च्या पाऊणे दोन एकर जमिनीवर त्या स्वत: मुलासोबत राबतात. यापूर्वी 1993 मध्ये त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर ते फेडता न आल्याने कर्ज घेता आले नाही. कष्टाने शेती करून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला होता. मागील कर्जमाफी योजनेत त्यांचे जुने कर्ज माफ झाले.

नव्याने कर्ज मिळण्याची आशा तर निर्माण झाली, मात्र अशिक्षित असल्याने कर्ज मिळविण्यासाठी बँकेत चकरा मारणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे त्यांच्यासाठी कठीण होते. गेल्यावर्षी लावलेल्या कापसापासूनही फारसे उत्पन्न मिळाले नाही. वर्षभराच्या 40 हजार उत्पन्नात 6 व्यक्तींचे कुटुंब सांभाळून शेतीसाठी बी-बियाणे आणि खत घेणे त्यांना कठीणच होते. अशात मेळाव्याची माहिती मिळाल्याने नवी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली.

सोमवारी म्हसावद येथील मेळाव्याला त्या आपल्या मुलासह  उपस्थित होत्या. त्यांच्याकडून कर्जासाठी अर्ज भरून घेण्यात आला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीन तासात कर्ज रकमेचा धनादेश त्याच ठिकाणी त्यांना तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी सुपूर्द केला. कर्ज मंजूर होताच कनीबाईंचा चेहरा खुलला. ‘आताचा हंगाम चांगला जाणार’ अशी त्यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. यावर्षी त्यांनी शेतात ऊस लावला आहे. मिळालेल्या कर्जाने साहजिकच त्यांच्या मनात नवी आशा निर्माण केली….हिरव्या शेताची आणि चांगल्या उत्पन्नाची!

कनीबाई ठाकरे-एका दिवसात कर्ज मिळाल्याने मी खूप खुश आहे. या कर्जाचा उपयोग शेतीसाठी होणार आहे. यापूर्वी कर्जासाठी फिरूनही कर्ज मिळाले नव्हते. माझ्याकडे भाड्यासाठी फारसे पैसे नसल्याने थकून जात होती. कर्ज मिळाल्याने आधार मिळाला आहे, शासनाचे खूपखूप आभार!

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...