तुळजापूर/अक्षय वायकर - तुळजापूर तालुक्यातील कात्री रोड, अपसिंगा येथील ऋषिकेश पाटील यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जनावरे वाहून गेली आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.तसेच जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, शेतकरी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

शेतऱ्यांसाठी मदत केली पाहिजे...
ReplyDelete