Skip to main content

येत्या 31 मार्चपर्यंत Pan Card ला Aadhar Card लिंक न केल्यास Pan Card होणार बंद




येत्या 31 मार्चपर्यंत Pan Card ला  Aadhar Card लिंक केलं नाही तर 1 एप्रिलपासून  तुमचे Pan Card बंद होणार आहे. त्यानंतर जर आधार लिंक करायचे असेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.


नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. आता येत्या 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद पडू शकते. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 



या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा डेडलाईन वाढवली होती. मंगळवारी लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. 


इतर सुविधांच्या लाभापासून वंचितकेंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड  (CBDT) ने स्पष्ट केलंय की नागरिकांना त्यांना दिलेल्या वेळेच्या आत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करावं. असं केलं नाही तर संबंधित पॅन कार्ड बंद होईल. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच बँक खाते उघडणे, बँकांचे व्यवहार, सरकारी पेन्शन, एलपीजी सब्सिडी, स्कॉलरशीप अशी अनेक सुविधांपासून वंचित रहावं लागेल. 


ऑनलाइन पद्धतीने लिंक करता येईलजर तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणार असाल तर ते आता ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकेल.  त्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in या सरकारच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यामध्ये पॅनला आधार लिंक करण्याचा  पर्याय आहे. तो क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल. त्यावर तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा. तसेच इतर व्यक्तिगत माहिती भरावी लागेल. त्यावेळी तुम्हाला एक ओटीटी क्रमांक येईल. तो ओटीटी क्रमांक भरल्यानंतर लिंक आधार असा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल. 



Source-marathi.abplive.com

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...