Skip to main content

शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा या मागणीसाठी विद्यार्थी व युवक संघटनाचे उपोषण

 



सोलापूर - स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) तर्फे 23 मार्च रोजी शाहिद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या आणि बेरोजगारिच्या विरोधात राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही संघटनांच्या वतीने 23 मार्च रोजी सोलापुरातील दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात युवक आणि विद्यार्थ्यांनी लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.प्रारंभी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते शहिद भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपोषणस्थळी सर्व सामान्यांना न परवडणारी ऑनलाइन शिक्षण प्रणाली रद्द करा,तातडीने पारदर्शक नोकरभरती प्रक्रिया राबवा,शिक्षणाचे खाजगिकरण बंद करा आणि विविध मागण्यांचे फलक लावण्यात आले होते। याप्रसंगी dyfi चे महाराष्ट्र राज्याचे सचिव मंडळ सदस्य दत्ता चव्हाण आणि sfi चे जिल्हा अध्यक्ष माललेशम कारमपुरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उपोषण करत असताना उपोषणकर्ते युवक आणि विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक गीते सादर केली. दरम्यान संयुक्त कामगार कृती समिती आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने अशोक इंदापुरे,नसीमा शेख,सुनंदा बल्ला यांनी उपोषणकर्त्याना पाठिंबा दिला.तसेच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महासचिव ऍड एम एच शेख यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्याना पाठिंबा दिला. याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क परिधान केल्याचे दिसून आले। याप्रसंगी sfi चे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, मीरा कांबळे, शामसुंदर आडम, राहुल भैसे, प्रशांत आडम, विजय साबळे, अश्विनी मामड्याल, पूनम गायकवाड, प्रिया किर्तने, dyfi चे जिल्हा अध्यक्ष मुन्ना कलबुर्गी,  प्रदेश उपाध्यक्ष अशोक बल्ला, जिल्हा सचिव अनिल वासम, अकिल शेख, आसिफ पठाण, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, प्रविण आडम, दिनेश बडगू, विनायक भैरी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...