Skip to main content

मेरा रेशन मोबाईल अ‍ॅपची सुरुवात



नवी दिल्‍ली- ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी आज “वन नेशन वन रेशन कार्ड” (ओएनओआरसी) योजनेवरील पत्रकार परिषदेत भाषण केले. यावेळी सचिवांनी मेरा रेशन मोबाइल अ‍ॅपचे देखील उदघाटन केले. या अ‍ॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या रेशनकार्ड धारकांना होईल.

या प्रसंगी माध्यमांना माहिती देताना पांडे म्हणाले की, ऑगस्ट 2019 मध्ये सुरुवातीला 4 राज्यांत सुरू करण्यात आलेली यंत्रणा अल्पावधीतच म्हणजे डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आणि येत्या काही महिन्यातच उर्वरित 4 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात (आसाम, छत्तीसगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल) एकत्रीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पांडे यांनी माहिती दिली की सध्या या प्रणालीत देशातील सुमारे 69 कोटी एनएफएसए अर्थात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी (सुमारे 86% एनएफएसए लोकसंख्या) आहेत आणि एक राष्ट्र एक रेशन कार्डच्या  अंतर्गत महिना  सरासरी 1.5 ते 1.6 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार नोंदवले जात आहेत.

कोविड -19 महामारीच्या काळात  प्रत्येक एनएफएसए लाभार्थीसाठी विशेषतः स्थलांतरितांसाठी ओएनओआरसी ही एक मूल्यवर्धित सेवा असल्याचे सिद्ध झाले आहे असे पांडे यांनी सांगितले.

परप्रांतीय एनएफएसए लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या संदर्भात ते म्हणाले की, विभाग इतर मंत्रालये / विभागांशी सातत्याने सहकार्य करीत आहे. ते म्हणाले की ओएनआरओसी प्रणालीमध्ये स्थलांतरितांच्या पोर्टलचे एकत्रीकरण कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या पाठिंब्याने केले जात आहे. यात ओएनओआरसीला गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पीएम स्वनिधी कार्यक्रमाचा भाग बनविण्यात आले आहे, भारतीय रेल्वेच्या श्रमिक विशेष सह रेल्वेने प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांसाठी जागरूकता मोहीम (रेल्वे स्थानकांवर घोषणा व दृक-श्राव्य प्रदर्शन) आणि आयइसी/ क्रिएटिव्ह चा विकास तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पीआयबी, माय गव्ह, ब्यूरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन द्वारे माध्यम प्रसिद्धी यांचा यात समावेश आहे.


देशभरातील 2,400 हून अधिक रेल्वे स्थानकांवर आणि रेडिओ स्पॉट्सच्या माध्यमातून हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे.


अँप्प डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -https://bit.ly/2OT9i4c

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...