Skip to main content

परिक्षा शुल्क परत न दिल्यास विद्यापीठावर मोर्चा काढू - एसएफआय चा इशारा






सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर सोलापूर विद्यापीठाने सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव शहर आणि ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचा कारण पुढे करीत बी.ए, बी.कॉम, बी.एससी व इतर विभागातील विद्यार्थ्यांच्या  परिक्षा ऑनलाइन   पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला. पण विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन  परिक्षा घेताना जेवढी परिक्षा शुल्क घ्यायचे तेवढीच परिक्षा शुल्क ऑनलाइन  परिक्षेसाठी घेतली जात आहे. मागच्या वर्षी ही मार्च महिन्यात सर्व विद्यार्थ्यांकडून आधीच परिक्षा शुल्क घेतले आणि त्यानंतर लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले. विद्यार्थ्यांचा ऑफलाइन  तर सोडाच ऑनलाइन परिक्षा ही घेतली नाही.


कोरोना प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षभरापासून पालकांच्या हाताला काम नाही. कामाचा वेळ ही कमी करण्यात आले आहे. सध्याला विद्यार्थ्यांना व पालकांना आॅनलाईन शिक्षण पध्दती परवडणारे नसतानाही पालकांनी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क तात्काळ परत न केल्यास संघटनेकडून परिक्षार्थी विद्यार्थ्यांना घेऊन विद्यापिठावर मोर्चा काढू असा इशारा एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी दिला.  

 अशा आशयाचे निवेदन  स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा समिती च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू यांना देण्यात आले.

                 यावेळी एसएफआयचे सहसचिव श्यामसुंदर आडम, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, मा. सचिवा मीरा कांबळे, जि. क. सदस्य अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रशांत आडम इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...