Skip to main content

पोलीस-नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार



मुंबई  : उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.


या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी हे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.


पोलीस-नक्षल चकमक


मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांनी नक्षलविरोधी अभियानाची आखणी केली. त्यानुसार श्री.कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 च्या जवानांनी नक्षलविरोधी कारवाई सुरु केली. त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढविला. सी-60 जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळी 3 पुरुष नक्षलवादी व 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असून मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.


43 लाख रुपयांचे बक्षीस


यात मृतक नक्षलवाद्यांवर जवळपास 43 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत सदर घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक 12 बोअर रायफल, एक 303 रायफल, एक 8 एमएम रायफल तसेच मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पुढील प्रमाणे आहे.


1) रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी वय-46 वर्ष रा. जवेली (बु.) पोस्टे जारावंडी (डीकेएसझेडसीएम) टिपागड एलओएस पदावर कार्यरत होता. याच्यावर एकूण- 155 गुन्हे दाखल असुन यात खुनाचे- 41 गुन्हे, चकमकीचे - 78 गुन्हे, दरोडा-1 विविध जाळपोळीचे- 16 गुन्हे, व इतर-19 अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


2) राजु ऊर्फ सुखदेव बुधेसींग नैताम वय-32 वर्ष रा. मरकेगाव पोमके सावरगाव टिपागड एलओस उपकंमाडर या पदावर कार्यरत होता. एकूण- 14 गुन्हे दाखल असून यात खुनाचे- 05 गुन्हे, चकमकीचे - 03 गुन्हे, जाळपोळीचे- 03 गुन्हे, दरोडा-01 व इतर -02 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


3) अमर मुया कुंजाम वय-30 वर्ष रा. जागरगुडा बस्तर एरीया (छ.ग.) पार्टी मेंबर कसनसुर एलओएस या पदावर याच्यावर एकूण- 11 गुन्हे दाखल असुन यात चकमकीचे 08 गुन्हे व इतर -03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


4) सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनीता गावडे ऊर्फ आनाम वय-38 वर्ष रा. कापेवंचा उपपोस्टे राजाराम (खां.) टिपागड एलओएस प्लाटुन क्र. 15 ची पार्टी मेंबर हिचेवर एकूण- 31 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 11 गुन्हे, चकमकीचे – 11 गुन्हे, व इतर -09 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकूण 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


5) अस्मिता ऊर्फ सुखलु पदा वय - 28 वर्ष रा. गुर्रेकसा पोमके कटेझारी टिपागड एलओएस पार्टी मेंबर हिचेवर एकूण-11 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 01 गुन्हे, चकमकीचे - 05 गुन्हे, जाळपोळीचे- 02 गुन्हे व इतर - 03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकूण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Comments

Popular posts from this blog

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...