Skip to main content

नोकरी इच्छुकांची वयोमर्यादा वाढविण्यासंदर्भात स्पष्टीकरण

 


दिल्ली - केंद्र सरकारच्या पदांवरील भरती संदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या संस्था (UPSC) परीक्षा सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी  कोविड -19 महामारीच्या सुरक्षा  मार्गदर्शक तत्वांचे पालन करत  आवश्यक त्या उपाययोजना  करत आहे.नागरी सेवेच्या 2020 च्या पूर्वपरीक्षा दिनांक 04.10.2020 रोजी आयोजित करण्यात आली,त्यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने उमेदवारांना नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्यायही दिला होता जेणेकरून जे  उमेदवार कोविड-19 महामारीच्या दरम्यान अन्य ठिकाणी गेले होते ,त्यांना देखील परीक्षेला बसता येऊ शकले असते . हे लक्षात घेता ,महामारीचा   काळ आणि टाळेबंदी या कारणास्तव  केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी   होणाऱ्या परीक्षांसाठी उमेदवारांची  वयोमर्यादा वाढविण्याचा प्रश्न उदभवत नाही.


याप्रमाणेच  राज्य सरकारांच्या विविध पदांसाठी  नोकरी इच्छुक तरुणांची अधिकतम वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्याच्या संदर्भातील निर्णय हा संबंधित राज्य सरकारने घ्यायला हवा.


ही माहिती, पूर्वोत्तर राज्य विकास मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय तसेच अणुऊर्जा आणि अंतरीक्ष ,मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तराद्वारे दिली.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...