Skip to main content

कोरोना चाचणीचा बनावट अहवाल देणाऱ्या ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द

 

मुंबई, दि. 10 : अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. तथापि, अमरावती जिल्ह्यात रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली आहे. काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवत नसल्याचे आणि त्यांनी दिलेले काही रिपोर्ट हे बनावट असल्याचे लक्षात आल्याने, अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.


यासंदर्भात निवेदन करताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर तसेच रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट या चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांपैकी आरटीपीसीआर ही गोल्ड स्टँडर्ड चाचणी मानण्यात येते. कारण या आरटीपीसीआर चाचणीने 60 ते 65 टक्के अचूक निदान होते. तर रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट चाचणीद्वारे 30 ते 35 टक्के इतके अचूक निदान होते.


प्रयोशाळेतील इतर कोणत्याही चाचण्यांप्रमाणे या चाचण्यांसही काही मर्यादा आहेत. लक्षण विरहीत व्यक्तींमध्ये  संसर्गाच्या प्रमाणात कमी कालावधीत वेगवेगळा निकाल दाखविण्याची शक्यता आहे. याशिवाय खालील कारणांमुळेही तफावत येऊ शकते.


दोन वेगवेगळ्या कालावधीत घेण्यात आलेले नमुन्यांमध्ये (सॅम्पल) विषाणूंची संख्या अत्यल्प असल्याने चाचणीच्या निदानात तफावत येण्याची शक्यता असते.


काही वेळा एखादा नमुना इतर कारणांमुळे देखील दूषित (contaminate) झाल्यास, निदानात नमुना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते.


तपासणीसाठी नमुना (स्वैब) घेतल्यानंतर शीत साखळीचा अवलंब व्यवस्थितरीत्या न करता नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत गेला तर विपरीत निदान होण्याची शक्यता असते.


तसेच संबंधित प्रयोगशाळा वापरत असलेल्या टेस्ट किट्सची संवेदनशिलता/अचूकता यावरही निदानाची अचूकता अवलंबून असते.


कोवीड-१९ साथरोगाच्या सुरूवातीच्या कालावधीत राज्यात एनआयए, पुणे ही एकमेव प्रयोगशाळा कोविड-१९ निदानासाठी कार्यरत होती.


तथापि, आता आयसीएमआर आणि एनएबीएल मानकानुसार पात्र असलेल्या प्रयोगशाळांना आयसीएमआरकडून मान्यता देण्यात येते. आज राज्यात ३७६ शासकीय आणि १४१ खाजगी अशा एकूण ५१७ प्रयोगशाळाना आयसीएमआरने मान्यता दिलेली आहे.


शासनाकडून कोविड-१९ निदानाचे काम करण्यात येते. या प्रयोगशाळांपैकी ९८ शासकीय आणि १२० खाजगी अशा एकूण २१८ प्रयोगशाळांकडून कोविड-१९ च्या निदानासाठी आरटीपीसीआर चाचणी पद्धतीचा अवलंब केला जातो. या प्रयोगशाळांचे काम योग्यरीत्या होण्यासाठी गुणवत्ता आणि तपासणीसाठी आयसीएमआरने कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई व एनआयव्ही, पुणे या दोन प्रयोगशाळांना मार्गदर्शनासाठी मेन्टॉर म्हणून निवडण्यात आलेले आहे.


तसेच प्रशासनाच्या संदर्भात जिल्हास्तरीय नियंत्रण अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यरत आहेत. दिनांक ०९.०३.२०२१ पर्यंत एकूण १ कोटी ७० लाख १२ हजार ३१५ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...