Skip to main content

शिवजयंती विशेष - मला कळालेले शिवाजी महाराज ..




जाणता राजा, रयतेचा राजा इ.अनेक उपमा देऊन छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात.शिवजयंती च्या अनुषंगाने सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीने त्यांच्या मीडियाच्या विद्यार्थ्यांना "मला कळलेले छत्रपती शिवाजी महाराज" यावर मत व्यक्त करायला सांगितले त्यातल्या निवडक  प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय...



मला कळलेलं शिवाजी महाराज म्हणजे द मॅनेजमेंट गुरू. मॅनेजमेंट कशी असावी आणि कश्या पध्दतीने हाताळावी हे समजून घ्यायचं असेल तर महाराजांना नीट समजून घेऊन त्यांच्या अभ्यास केला तर अनेक घटक कळू शकतात.-शोभिका नकाशे,भाऊसाहेब हिरे विद्यालय



माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शूर-पराक्रमी वीर-पुत्र. साहस, धाडस आणि नियोजन व नेतृत्व गुण मला शिवाजी महाराजांच्या अनेक कथांमधून वाचायला मिळाले . रयतेच्या सुखासाठी धडपड करणारे, अन्यायाच्या विरोध नेहमी उभे राहणारे, संस्कारी पुत्र म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज अर्थात शिवबा.-रितिका यादव,अनुयोग विद्यालय



छत्रपती शिवाजी महाराज खूप धाडसी होते. मला त्यांच्या विषयी आदर वाटतो. शिवाजी महाराज्यांच्या सैन्यात सर्व धर्म-पंथ व  जातीचे मावळे होते. त्यांनी कोणत्याही जातीचा भेदभाव केला नाही. शिवाजी महाराज हिंदू असून ही त्यांनी कधी ही मुस्लिमांचा दुजाभाव केला नाही. त्यांनी स्वत: गड बांधले व काही गड जिंकण्यासाठी खुप लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर  अत्याचार   करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. -प्रनिता बोले,एन.एम. जाशी शाळा 



छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल कि आठवते स्वराज्य. शिवाजी महाराज्यांचे मावळे आणि त्यांचे प्रेम इतिहासाच्या पुस्तकांतून वाचलेल्या त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आठवतात व नेहमी त्या नेहमी प्रेरणा देतात.-सुजल जाधव. ,अनुयोग इंग्लिश माध्यम शाळा



मला कळलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठा साम्राज्याचे संस्थापक, विचारांनी श्रीमंत व योगी असणारे व्यक्तिमत्त्व .  रयतेच्या भल्याचं ज्यांना कळलं ते म्हणजे महाराज, स्वतःचे अस्तित्व  स्वबळावर ज्यांनी निर्माण केलं ते म्हणजे शिवाजी महाराज व तुम्हा-आम्हाला दिशा देणारे दिशा दर्शक म्हणजे शिवाजी महाराज.-साहिल सिंह ,टेम्बीनाका शाळा (ठाणे )


छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी एक योद्धा आहेत आणि ते आज पण एक योद्धाच्या रुपात आपल्या हृदयात, मनात जगतात. ते मराठ्याचा अभिमान आहे. महाराज त्यांचा पालकांना देव मानत होते. देशावर खूप प्रेम करत होते की देशाची सेवा करत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. ते म्हणत होते की "समोर संकट दिसलं ना, त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभ राहायच आणि विजय मिळत नाही तो पर्यंत माघार घ्यायची नाही.असे ते आज पण मला प्रेरणा देतात! जय शिवाजी, जय भवानी! जय महाराष्ट्र!! जय शिवराय!!- किर्ती पटवा ,साधना विद्यालय


छत्रपती शिवाजी महाराजा सारखे राजे मी आज पर्यंत कधीच पाहिले नाही. शिवाजी महाराज खुप धाडसी होते. मला त्याच्या विषयी खूप आदर वाटतो. महाराजांचे स्त्रियांबद्दल असलेला आदर खरेच आपल्याला खूप काही शिकवणारे आहे. -शुभ्रा मोरे,साधना विद्यालया, सायन

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...