Skip to main content

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या सूचना



सोलापूर : अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दिल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्य तथा उपायुक्त छाया गाडेकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी यु.जे. कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव, सहायक पोलीस आयुक्त हेमंत भट, संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नागनाथ पवार, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम.एन. कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक एल.ए. क्षीरसागर, महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे यांच्यासह कामगारांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या घरकुल, शिक्षण, कौशल्य विकास, जात पडताळणी अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

श्रीमती शिंदे म्हणाल्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहानुभूती आणि संवेदनशीलता दाखवून योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. मागासवर्गीय समाजावर अन्याय होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मनपाने सफाई कामगारांसाठी वेगळी योजना राबवावी. रमाई आणि श्रमसाफल्य घरकुल योजना वेगळ्या राबवा. मात्र दोन्ही वसाहती एकाच ठिकाणी करा. प्रत्येक विभागाने अनुसूचित जाती कल्याण समितीच्या योजनांचा निधी तत्काळ खर्च करावा. सफाई कामगारांच्या मुलांना दाखले मिळण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्नशील रहावे, अशा सूचना केल्या.

जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती सदस्यांना त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जातीच्या दाखल्याऐवजी शाळा सोडल्याचा दाखला घेण्याच्या सूचनाही त्यांनी केली. समाज कल्याण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वसतीगृहांचा वेळोवेळी आढावा घेऊन सोयी-सुविधांचा अभाव असेल तर कारवाई करावी. जातपडताळणी समितीने विद्यार्थ्यांचे दाखले त्वरित मिळण्यासाठी कार्यवाही करावी, असेही श्रीमती शिंदे यांनी सांगितले.

17 नंबरचा अर्ज भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शासनदरबारी प्रस्ताव पाठवून प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सहायक आयुक्त श्री. आढे यांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सादरीकरणातून दिली.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...