Skip to main content

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नरेंद्र मोदी सरकार राज्यातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह



केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून एनडीआरएफच्या तुकडीला मार्गदर्शन केले


या आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राथमिक तत्त्वावर आवश्यक ती मदत केली जाईल


नवी दिल्ली -उत्तराखंड येथील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या या काळात राज्याबरोबर नरेंद्र मोदी सरकार खांद्याला खांदा लावून उभे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात पत्रकारांशी बोलताना अमित शाह म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ते म्हणाले की, अन्य तुकड्या देखील उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. लवकरच बाकीच्या तुकड्या देखील तेथे दाखल होतील. आयटीबीपीचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले आहेत, बरोबरच राज्यातील यंत्रणा देखील कार्यान्वित झाल्या आहेत, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, जोशीमठाच्या जवळ हिमकडा आणि डोंगरकडा नदीमध्ये कोसळल्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप वाढला आहे तसेच प्रथम ऋषी गंगा आणि त्यानंतर अलकनंदामध्ये पाण्याची पातळी वाढण्यास सुरूवात झाली आहे. शाह पुढे म्हणाले की, काही लोक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती देखील हाती आली आहे. संकटाच्या या काळात सरकार उत्तराखंडच्या पाठिशी आहे आणि शक्य ती सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करून लवकरात लवकर या संकटावर मात करून जनजीवन पूर्वीसारखे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे आणि हवाई दलालाही देखील सज्जतेची सूचना करण्यात आली आहे. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधानांनी देखील दूरध्वनीवर एनडीआरएफच्या तुकडीला मार्गदर्शन केले आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे गृह मंत्रालयाच्या एनडीआरएफच्या नियंत्रण कक्षात स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अमित शाह असेही म्हणाले की, ते उत्तराखंडच्या सर्व नागरिकांना हे आश्वास्त करु इच्छितात की, सर्व परिस्थिती लक्षात घेता, लवकरात लवकर दुर्घटनेची स्थिती नियंत्रणात आणली जाईल आणि या आपत्तीपासून बचावासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्राथमिक स्वरूपावर आवश्यक असलेली सर्व मदत केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...