Skip to main content

शेतरस्त्याच्या अडचणीसाठी शेतकरी करतायत शिवार फाउंडेशनला फोन

 


शेत रस्त्याच्या अडचणीचे शिवारकडे धडकले २८८ फोन ,
 मागील दोन महिन्यात तक्रारींचा पाऊस
 
उस्मानाबाद:-जिल्ह्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मागील ०६ वर्षातील शिवार संसदच्या अभ्यासातून वेळोवेळी शेत रस्ताचा प्रश्र्न आणि शेतकऱ्याचे मानसिक आरोग्य, त्रस्त शेतकरी समोर आला आहे. 

अशातच, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान हाती घेतले. या अभियानामध्ये शिवार हेल्पलाइनने समन्वयाची भूमिका घेऊन प्रश्न समजावून गावनिहाय, तालुकानिहाय संबंधित अधिकारी, कर्मचारीशी चर्चा करून संबंधित शेतकरयांना योग्य ते मार्गदर्शन केले. अतिक्रमणमुक्त शेतरस्ते अभियान सुरू होण्या अगोदर शेत रस्त्याच्या अडचणी विषयी शिवार हेल्पलाईनवर  ०६ फोन आले होते. अभियान सुरू झाल्यावर शेत रस्त्याच्या अडचणी असतील तर, " शिवार हेल्पलाईन ला संपर्क करा " असे आवाहन शिवार फाऊंडेशनकडून करण्यात आले. या आवाहनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. २८८ शेतकऱ्यांनी हेल्पलाइनला फोन करून शेत रस्त्याच्या व्यथा मांडल्या व अजून दररोज शेतकरी फोन करत आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातून सर्वाधिक १०५ फोन आहेत. नंतर तुळजापूर ५३, उमरगा ३३, कळंब ३१, लोहारा २३, परांडा १०, वाशी ०९ भूम ०८, फोन आहेत. बाहेरील दहा जिल्ह्यातून १६ फोन आले आहेत. त्यांच्या संबंधित जिल्हातील जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रश्न पोहचवले आहेत. त्याही जिल्ह्यात योग्य ती दखल घेऊन कार्यवाही सुरू केली आहे. आलेल्या सर्व फोनचे तालुक्यानुसार वर्गीकरण करून शिवार फाऊंडेशन संचलित शिवार हेल्पलाइनद्वारे जिल्हा प्रशासनाकडे ही माहिती पाठवलेली आहे. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन सदरील अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा सुरू केला आहे. 

शिवार फाउंडेशन ने प्रशासनाकडे सांगितलेल्या काही महत्वाच्या नोंदी: 

* निकालानंतर ही प्रलंबित प्रकरणे मोठ्या प्रमाणात
* बरीच प्रकरणे भूमिअभिलेख विभागाकडे प्रलंबित .
* तहसीलदार यांनी निकाल दिल्यानंतर खूप लोकांनी प्रकरण कोर्टात दाखल करून प्रकरण लांबवलेले. 
* गावातील जातीपातीच्या भांडणामुळे पण काही प्रकरणे चिघळलेली.
* संबंधित गाव, तालुक्यास्थरावर कोरोना आणि निवडणुकीचे कारण सांगून अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केलेली दिसून आली.
* मंडळ अधिकारी पाहणी नंतरच्या कार्यवाही साठी वेळ लागतो आहे व काही ठिकाणी पाहणीच रखडली आहे.

शेतकऱ्यांना शेत रस्ता तसेच त्यांच्या शेतीविषयक, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शासकीय इत्यादी कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत उपलब्ध सुरू आहे.

  यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना अशा शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...