Skip to main content

लुटारु सरकारला शिवनितीने उत्तर दिले पाहिजे- कॉ.नरसय्या आडम मास्तर

 



सोलापूर  -  राजा  शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाला मूठमाती दिली आहे. अन्नदाता सुखी तर राज्य सुखी म्हणून शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाई नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला आदेश देणारे प्रजाहितदक्ष राजा शिवछत्रपतींच्या राज्यात बळिराजा न्यायासाठी गेली 82  दिवस झाले सरकारशी झगडू लागला.परंतु जनतेची लूट करणाऱ्या सरकार ला शिव प्रभूंच्या नितीने प्रत्युत्तर दिले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले.


मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी माकपचे राज्यसचिव माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माकप च्या नगरसेविका कामीनीताई आडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  


तदनंतर शिवाजी चौक येथील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रास्तविक अँड.एम.एच.शेख यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.अनिल वासम यांनी केले. 


यावेळी व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, युसूफ मेजर, सिद्धप्पा कलशेट्टी,दीपक निकंबे,विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला, बाळासाहेब मल्याळ दत्ता चव्हाण, मल्लेशाम कारमपूरी, मीरा कांबळे, किशोर झेंडेकर, दाऊद शेख, इलियास सिद्दीकी, नरेश दूगाने, बजरंग गायकवाड, अकिल शेख, आसिफ पठाण,  भारत पाथरूट आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...