बार्शी - राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायच्या सरपंच पदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंच पदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक 26:2.2021 रोजी. बार्शी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या पिंपळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अटी तटीची लढत झाली. यामधे माजी मंत्री. मा. दिलीप. सोपल साहेब प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे 7पैकी 5उमेदवार बहुमताने विजयी झाले पिंपळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी जयश्री रमेश चौधरी यांचा तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन बाळनाथ चौधरी यांचा एक एक अर्ज दाखल झाला होता.सरपंच पदाला जयश्री चौधरी यांना पूजा पांडुरंग चौधरी सूचक तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन आप्पा यांना आजमुद्धीन मुलांनी हे सूचक राहिले या वेळी नवनिर्वाचित सदस्यामध्य आजमोदीन मुलाणी रेश्मा संदीप चौधरी पूजा पांडुरंग चौधरी रोहित. अनिल चौधरी हे उपस्थित होते या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे आर. कोळी विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी ग्रामसेवक के. व्ही सुरुसे यांनी काम पहिले सदर निवड प्रक्रिया बिन विरोध करण्यासाठी रमेश तात्या चौधरी जेष्ठ नेते राजेंद्र दादा. चौधरी अंबादास सावकार अनुबा अण्णा दत्तापाटील गोवर्धन माने परसराम पाटील पाटिलराव तात्या लिंबाजी ओव्हाळ मधुकर माने भाऊसाहेब चौधरी राजकुमार चौधरी बुबासाहेब डांगे आण्याबा डांगे लक्ष्मण डांगे दिगंबर चौधरी मधू अण्णा महिवाल मुलाणी शिवाजी दादा बबन जीवनराव चौधरी विलास प्रभू चौधरी यांची भूमिका महत्वाची ठरली अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडी चे उमेदवार बहुमताने विजयी झाल्यामुळे ग्रामपंचायत समोर आनंद साजरा केला.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment