Skip to main content

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण




मुंबई दि. २७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत  पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे.

पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी,रविवारी तसेच शासकीय सुट्टयांच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण ४ अभ्यास घटकांचे दिवसाला २ तास याप्रमाणे ऑनलाईन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील.

हे प्रशिक्षण वर्ग बार्टीच्या 'Barti Online' या युट्यूब चॅनल वरूनही थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक अशा घटकांचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य,मार्गदर्शकांच्या टिपणे (नोट्स) याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल. उमेदवारांच्या शंकांचे निरसन ई-मेलद्वारे करण्यात येईल.


बार्टी संस्थेद्वारे आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी, समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण (मैदानी प्रशिक्षण) वर्ग घेण्यात येईल, असेही बार्टीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...