Skip to main content

मोदी साहेब शेतकऱ्यांबाबत आत्मचिंतन करा- कॉ.नरसय्या आडम मास्तर



सोलापूर/दत्ता चव्हाण -जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या विरोधात केंद्र सरकारने पारित केलेल्या विधेयक तातडीने रद्द करण्यासाठी जगण्या मरण्याची आणि अस्तित्वाची लढाई करत आहेत. त्या निष्पाप शेतकऱ्यावर पोलिसांची दंडेलशाही चालू आहे.सरकार हस्तक्षेप करत नाही.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मचिंतन करावे अशी मार्मिक टीका आडम यांनी व्यक्त केली. 

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सांय 4 वाजता मा.निवासी उपजिल्हाधिकारी  अजित देशमुख यांना दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा व त्यांच्यावरील दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे महासचिव अँड एम.एच.शेख  यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात नगरसेविका कामिनी आडम, नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, व्यकंटेश कोंगारी,युसूफ शेख मेजर , म.हानिफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, अनिल वासम आदींचा समावेश होता.


सदर निवेदनात असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो आणि स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणून मोदी 2004 साली सत्तेवर आले. आता त्यांनी बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्याच विरोधात तीन कायदे केले आहेत. शेतीमाल बड्या कंपन्या व व्यापाऱ्यांच्या, साठेबाजांच्या व काळाबाजारवाल्यांच्या ताब्यात देणारे कायदे केले. गरीब शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा कायदा केला. या कायद्याने सरकार आता शेतकऱ्याला शेतातून उठवणार, आपलेच शेत गिळणाऱ्या कंपनीचा चपराशी करणार. अवकाळी पावसासोबत सरकारपण शेतकऱ्याला झोडपू लागलं आहे. पुरेशी नुकसानभरपाई देत नाही. सगळी पिके वाहून गेली. पण सरकारला शेतकऱ्याची दयामाया येत नाही. शेतमालाला किफायतशीर भाव देत नाही, कारण भांडवलदार व व्यापारी डोळे वटारतात. कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जमाफी भाजप सरकार करत नाही. पण नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या अशा देश सोडून पळालेल्या कर्जबुडव्या भांडवलदारांचे 68000 कोटी रुपयांचे कर्ज हे सरकार कोरोना काळात एका झटक्यात माफ करून टाकते.     

मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मोडीत काढत आहे. मनरेगाची कामं काढत नाही. रेशनला धान्य येत नाही. मजुरी वाढवत नाही. किमान वेतनाचे दर वाढवत नाही. घरांसाठी प्लॉट देत नाही. पंतप्रधान घरकुल योजनेतून लाखोंना वगळले जाते. सगळ्या जमिनी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा सर्रास उद्योग सुरू आहे. 

बड्या भांडवलदारांनी भाजपला निवडणुकीसाठी पैसे दिले. त्यांच्या सांगण्यावरून भाजप सरकारने कामगारांविरुद्ध चार कायदे करून त्यांचे हक्क काढून घेतले. कामगारांना संघटना करता येणार नाही. संप करता येणार नाही. त्यांना नोकरीचे संरक्षण काढून घेतले आहे. मालकांना कामगारांचे जास्त शोषण करण्यास सरकारने सर्रास परवानगी दिली आहे.

या एकूण परिस्थितीत कामगारांनी दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी देशव्यापी संप करून आपला रोष प्रकट केला. याच वेळेला देशातील सर्वच शेतकरी संघटनानी एकत्रित येऊन दि. 26 नोव्हेंबर 2020 पासून दिल्ली घेराव करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे संपूर्ण देशभरातील शेतकरी आणि विशेषता दिल्ली परिसरातील राज्याच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करून सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत. यासाठी आंदोलन सुरु केले आहेत. या आंदोलकांवर सरकारने पोलीस सोडले असून त्यांच्या दिल्ली येण्याच्या मार्गावर मोठ-मोठे दगड टाकणे, खोदाई करणे इतकेच नव्हे तर बॅरीगेट घालून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही शेतकरी थांबत नसल्याचे पाहून त्यांच्यावर अश्रूधुळाच्या नळकांड्या, पाण्याची फवारणी, लाठीमार करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड वाताहत करूनही शेतकरी आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी आग्रही असून आपल्या जगण्याच्या न्यायासाठी ते दिल्लीकडे कूच करत आहेत. 

शेतकऱ्यांच्या न्याय अधिकाराच्या मागण्यांना सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स या राष्ट्रीय कामगार संघटनाने पाठींबा दिलेला असून त्यांच्यावर होणाऱ्या दडपशाहीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच शेतकऱ्यांच्या अधिकारावर व हक्कावर गदा आणणारे तीन कायदे ताबडतोबीने मागे घ्यावेत. अशी आग्रही मागणी करीत आहोत.  


यावेळी सरकार विरुद्ध घोषणा देण्यासाठी सिद्धपा शेख, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, विल्यम ससाणे, सलीम मुल्ला,बापू साबळे, दाऊद शेख,   विक्रम कलबुर्गी,जावेद सगरी सनी शेट्टी, अशोक बल्ला,विजय हरसुरे,दत्ता चव्हाण,वीरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, बाळासाहेब मल्याळ,वसीम मुल्ला, नरेश दुगाणे, वसीम देशमुख, दिनेश बडगू,विनायक भैरी,खादर शेख,डॉ.शिवानंद झळके, अप्पाशा चांगले,रवि गेंट्याल, मधुकर चिल्लाळ, नरेश गुल्लापल्ली आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...