तुळजापूर /अक्षय वायकर -तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर येथील रहिवासी व नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. संतोष पांडुरंग पवार यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा कुशल नेतृत्व जननायक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. संतोष पवार हे इतिहासाचे थोरअभ्यासक आहेत. त्यांनी अक्कलकोट येथील ऐतिहासिक राजवाड्यावर पीएच.डी.केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. या सर्व कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर केल्याचे व्यवस्थापक अमोल सुपेकर यांनी सांगितले. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. पवार यांचे डॉ. लक्ष्मण थिटे, डॉ मल्लिनाथ बिराजदार, प्रसाद देशमुख, भैरवनाथ कानडे, शिवानंद खुने, लक्ष्मण नरे यांनी अभिनंदन केले आहे.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment