Skip to main content

धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

 


मुंबई : मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य करून, गरीब  रूग्णांची सेवा करावी अशा सूचना विधी व न्याय विभाग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचार देण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी आर.एन. लढ्ढा, धर्मादाय आयुक्त आर.एन.जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवणे आदींसह अधिकारी आणि विविध धर्मादाय रूग्णालयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदी असल्यामुळे अनेक ग्रामीण रूग्णांना शहराकडे उपचारासाठी येता आले नाही. मात्र, आता अशा रूग्णांचा उपचारासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी शहराकडे येण्याचा ओघ वाढू शकतो. ग्रामीण भागातून प्रवास करून आलेल्या गरीब  जनतेला अडचण भासू नये किंवा उपचारात उणीवा राहू नये यासाठी समन्वय साधून त्यांना योग्य उपचार देणे गरजेचे आहे. रूग्णालय आणि रूग्ण यामध्ये संवाद आणि  समन्वय असणे गरजेचे आहे. याचबरोबर रूग्णालयात उपलब्ध जागा आणि उपचारपद्धती याची माहितीही प्रथमदर्शनी रूग्णांना मिळणे गरजेचे असून, रूग्णांना उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि पूर्तता करण्यासाठी यंत्रणाही असणे आवश्यक आहे. असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.

तसेच, रूग्णालयाला प्रशासकीय समस्या असतील त्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. रूग्णालयाला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी रूग्णालयांच्या प्रतिनिधींना सांगितले.

बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल,सैफी हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल,गुरूनानक हॉस्पिटल,मसीना हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल,प्रिन्स अली खान हॉस्पिटल, एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल अशा विविध धर्मादाय रूग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...