Skip to main content

हुलजंती येथील श्री महालिंगराया यात्रा रद्द पूर्वापार चालत आलेली परंपरा खंडित

 


 प्रतिनिधी/अमीर आत्तार  : सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिवाळी पाडव्याला हुलजंती येथे श्री महालिंगराया देवस्थनच्या वतीने भरवण्यात येणारी यात्रा व पालखी भेटीचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती देवस्थान कमिटी व श्री महालिंगराया यांचे वंशज श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांच्या वतीने देण्यात आली आहे.

 प्रत्येक वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अमावस्येच्या रात्री श्री शंकर-पार्वती श्री महालिंगराया यांचा सन्मान म्हणून प्रत्यक्ष श्री महालिंगराया मंदिरास फेटा बांधून जातात यास कर्नाटकी भाषेत मुंडास या नावाने देखील ओळखले जाते. तसेच हे एक जागृत देवस्थान असून  महाराष्ट्रा, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथे दक्षिण काशी म्हणून हुलजंती गावाला संबोधले जाते. या राज्यांमधून लाखो भाविकभक्त यात्रेस असतात.

गेल्या शेकडो वर्षापासून श्री बिरोबा, श्री महालिंगराया, अन्य सात पालख्यांचे भेटीचा सोहळा अमावस्येच्या पूर्व संध्येला मंदिरास 'मुंडास' झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 च्या सुमारास पालखी भेटीचा सोहळा संपन्न होत असतो.

परंतु प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना महामारी  असल्याकारणाने व कोरोनाचा संसर्ग वाढुनये या कारणाने खबरदारीचा उपाय म्हणून हुलजंती येथील यात्रा व पालखी सोहळा रद्द करण्यात आली असल्याची माहिती महालिंगराया ट्रस्ट कमिटी व श्री महालिंगराया चे वंशज श्रीकांत सोमूत्ते (वडियार) यांनी आमच्या प्रतिनिधीशी  संवाद साधताना दिली.  यामुळे भविकभक्तांनी यात्रेस व दर्शनास येऊनये असे आव्हान श्री महालिंगराया देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...