Skip to main content

कॅनरा बॅंकेच्या गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेड करणार बोंबाबोंब आंदोलन


                                                   

                                                    शेतकरी सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात                        

 पंढरपूर/रवीशंकर जमदाडे  - खेडभाळवणी येथील काही शेतकरी यांनी मे.2018 मध्ये दिड लाखाच्या आत कॅनरा बॅंक   पंढरपूर यांचे पिक कर्ज घेतलं होते.सदर शेतकरी हे भिमा नदी  पुरग्रस्त भागात क्षेत्रात येतात. परंतु दि.30 मार्च 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत सदर शेतकरी थकीत कर्जदार असल्याने त्यांना महात्मा जोतिराव फुले  कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नाही.कॅनरा बॅंकेचे मनमानी व गहाळ कारभारामुळे त्यांनी या शेतकर्यांची कर्ज खात्याची माहिती   शासनास सादर केली नाही. ह्या सगळ्या घटनांची जबाबदारी बॅंकेची असताना सुद्धा अधिकारी उडवा-उडवीची ऊत्तरे देत आहेत. त्यामुळे सदर शेतकरी यांना नविन कर्ज घेण्यासाठी अडचणी येत आहेत.वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही सदर शेतकरी यांना न्याय मिळत नसल्याने  येत्या शुक्रवारी दि.13/11/2020 रोजी संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने शेतकर्यांना व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन स.11 वा. कॅनरा बॅंके समोर बोंबाबोंब  आंदोलन करणार  असल्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे तालुका -अध्यक्ष..शिवश्री.बाळासाहेब बागल, सोलापूर जिल्हा संघटक- शिवश्री.प्रमोद जगदाळे,तावशीचे अध्यक्ष शिवश्री.अमोल कुंभार यांनी शेतकर्यांना सोबत घेऊन बॅंकेचे अधिकारी व सहाय्यक निबंधक पंढरपूर यांना दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...