Skip to main content

26 नोव्हेंबर रोजी बार्शीत कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांचा संयुक्त भव्य निर्धार मोर्चा



बार्शी/अब्दुल शेख -बार्शी  तालुका कामगार संयुक्त कृती समिती व अखिल भारतीय किसान सभा, आयटक, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या पदाधिकाऱ्यांची  संयुक्त बैठक दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी आयटक कामगार केंद्र येथे कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशभर कामगार व शेतकरी, विद्यार्थी यांच्या विरोधात असणारे शासनाचे धोरण हाणून पाडण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 वार शुक्रवार रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भव्य निर्धार मोर्चा बार्शी मध्ये सनदशीर लोकशाही मार्गाने तसेच कोवीड महामारी चे सर्व नियम पाळत व दक्षता घेऊन काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आली. 


अधिक माहिती अशी की कामगारांनी लढून मिळवलेले कायदे केंद्र सरकार हाणून पाडत आहे, तसेच शेतकऱ्यांना कंपनीकरण्याच्या खाईत ढकलून देत आहे त्याचप्रमाणे केंद्रीय संयुक्त कामगार कृती समितीने केलेल्या मागण्या सोबतच वाढत्या वीज बिलाचा प्रश्न, शेतीचे नुकसान भरपाई प्रश्न,  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, घरेलू कामगार बोर्ड प्रश्न, बांधकाम कामगारांच्या मागण्या, महाविद्यालयीन शिक्षकेतरांच्या मागण्यात, लॉक डाऊन काळामध्ये बंद केलेल्या एनटीसीच्या मिल चालू करणे व इतर मागण्यां बाबत या बैठकीमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.  या मागण्या घेऊनच या निरर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  या मोर्चामध्ये पुरोगामी कामगार संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


या बैठकीला अखिल भारतीय किसान सभा, आयटक संलग्न सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, घरेलू कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, इंटक प्रनित बार्शी टेक्स्टाईल मिल कामगार संघटना,वीज मंडळ वर्कर्स फेडरेशन यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.


या बैठकीमध्ये कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड एबी कुलकर्णी, कॉम्रेड लक्ष्मण घाडगे, लहू आगलावे, भारत भोसले बाळासाहेब जगदाळे, सरवदे ताई, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, बालाजी शितोळे, शाफीन बागवान, पवन आहिरे, भारत पवार, नागजी सोनवणे, प्रशांत पवार, नागनाथ गोसावी,विजय गलांडे, धनाजी पवार, ग्रामपंचायत कर्मचारी शौकत मुलानी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...