Skip to main content

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन




मुंबई :  मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया ॲवॉर्ड) देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रसारमाध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे दि. 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

 

विविध माध्यमातून मतदार जनजागृती करणाऱ्या माध्यम संस्थांसाठी हे पुस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये वर्तमानपत्र (प्रिंट मीडिया), इलेक्ट्रॉनिक (दूरचित्रवाहिनी) मीडिया, इलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मीडिया व ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया अशा चार विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माध्यमांद्वारे सुलभ मतदान, मतदान प्रक्रियेसंदर्भात जागृती, मतदानाचे महत्त्व आदी विषयांवर विविध माध्यमातून जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या माध्यमांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 

भारत निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पुरस्कारांसाठी माध्यम संस्थांची निकषांच्या आधारे शिफारस करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी व माध्यम संस्थांनी आपले अर्ज 18 नोव्हेंबरपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई 400032 ईमेल ceo_maharashtra@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत. पुरस्कारांचे निकष आणि अटींबाबत अधिक माहिती आयोगाच्या https://eci.gov.in/files/file/12547-national-media-award-for-best-campaign-on-voters-education-awareness-2020-memorandum-reg या लिंकवर उपलब्ध आहे.

 

माध्यम संस्था भारत निवडणूक आयोगाकडे थेट अर्जसुद्धा करू शकतात. त्यासाठीचे अर्ज दि. 20 नोव्हेंबरपर्यंत श्री.पवन दिवाण, अवर सचिव (संवाद), भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रस्ता, नवी दिल्ली 110001, फोन नं. 011-23052133, ई मेल media.election.eci@.com, pppaaawandiwan@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...