पंढरपूर/नामदेव लकडे -संभाजी ब्रिगेड ची महत्वपूर्ण मिटींग पंढरपूर येथे झाली यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आणि संभाजी ब्रिगेड च्या पंढरपूर शहर कार्याध्यक्ष पदी मा श्री विश्वजित भोसले यांची निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, छावा संघटना शहराध्यक्ष सागर चव्हाण, स्वराज्य संस्थापक संदीप मुटकुळे, विक्रमसिंह भोसले, अॅड सागर आटकळे, अॅड कीर्तीपाल सर्वगोड, राष्ट्रवादी उपाध्यक्ष दादा थिटे,शिवसेनेचे तानाजी मोरे , निलेश गंगतडे, सोपानकाका देशमुख,संतोष बंडगर,विशाल भोसले,रोहीत शिंदे,विकी झेंड,रामेश्वर साळुंखे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment