Skip to main content

नवीन पिक कर्जाचे तातडीने वाटप करा ,महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांना आ. नमिता मुंदडांच्या सूचना



 केज/अमर पाठक -  विविध संकटांचा सामना करत शेतकरी खरीप हंगामाला सामोरे जात असताना बँकांकडून मात्र त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वारंवार खेटे मारूनही बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज देण्यात यावे, विशेषतः नव्या पिक कर्जाचे तातडीने वाटप करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीक कर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही.  धान्य विकल्यानंतर कर्ज देणार का असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. यासंदर्भात आ. मुंदडा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस बँकेचे बीड जिल्हा प्रमुख  कुलकर्णी यांच्यासह मतदार संघातील सर्व शाखांचे व्यवस्थापक हजर होते. मागील २०-२५ वर्षात महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे जी गावे दत्तक आहेत तिथे एसबीआयने मोठ्या प्रमाणात पिक कर्ज दिले. यंदा मात्र त्यांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत एसबीआयकडे असणारे शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे वळल्यामुळे ताण वाढला आहे. ग्रामीण बँकेचे जुने आणि एसबीआय कडून आलेले नवे शेतकरी मिळून मोठी संख्या होत असल्यामुळे कर्जवाटपास उशीर होत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अखेर चर्चेअंती मुंदडा यांनी कालबद्ध नियोजन करून जुन्या पिककर्जासह नवीन शेतकऱ्यांना देखील कर्जाचे वाटप करावे अशा सूचना केल्या. बँक अधिकाऱ्यांनी सूचना मान्य करत तातडीने यावर कार्यवाही करू असे सांगितले. शेतकऱ्यांना हेलपाटे कमी करण्यासाठी निश्चित वार ठरवून देऊन त्यादिवशी त्यांची कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.  

‘एसबीआय’ने पीक कर्जाचे वाटप करणे सोयीचे 

सदरील गावातील एसबीआय कडून येणारे शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी नवीन असल्याने त्यांची पीक कर्ज वाटप प्रक्रिया संपूर्णतः नव्याने करावी लागणार आहे. हे वेळखाऊ आणि बँक, शेतकऱ्यास त्रासदायक आहे. ‘एसबीआय’ने पूर्वीप्रमाणे कर्जवाटप केले तर त्यांना फक्त नूतनीकरणाची प्रक्रिया पार पाडावी लागेल. हे काम सोपे आणि जलद होणारे असल्याने एसबीआय बँकेला कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत असे आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच, जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध शाखात मनुष्यबळाची कमतरता असून प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरावीत असेही त्या म्हणाल्या.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...