Skip to main content

भाजपची दार उघड आंदोलनातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीने केली घणाघाती टीका



भाजपने आज दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं.


पंढरपूर/नामदेव लकडे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मंदिरे पाच महिन्यांपासून बंद होती. अनलॉक 3 मध्ये केंद्र शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने अद्याप मंदिरे उघडली नाहीत. राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने विश्व वारकरी सेनेच्या मंदिरप्रवेश आंदोलनाला पाठिंबा दिला.

31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश केला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या मंदिर प्रवेश आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे . याच पार्श्वभूमीवर भाजपने आज दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं.भाजपच्या या आंदोलनावर वंचित बहुजन आघाडीने जोरदार टीका केली आहे. 'हे आंदोलन मंदिराचे दार उघडण्यासाठी नाही तर सत्तेचे दार उघडण्यासाठी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. भाजपचे मंदिर उघडण्याचे आंदोलन हे राजकारणासाठी आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन हे श्रद्धेपोटी आणि वंचितांचे हक्क न्याय मिळवून देण्यासाठी आहे. भाजपने आजपर्यंत धर्म मंदिरे यावरच आपली राजकीय पोळी भाजली,' असा घणाघात वंचित आघाडीकडून करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश आंदोलन पुकारल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळेच त्यांनी दार उघड उद्धवा दार उघड हे आंदोलन घेतलं. मात्र हे आंदोलन सत्तेचे दार उघडण्यासाठी असल्याचा घणाघात आनंद चंदनशिवे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना केला आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...