Skip to main content

बेजबाबदारपणे विद्वेशी वक्तव्य करणाऱ्या सुदर्शन चँनलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांचा मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून तीव्र निषेध



प्रतीनिधि /पुणे -  मुस्लीम समाजातील जे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितिशी सामना आणि संघर्ष करुन युपीएससी परीक्षा देतात, या परीक्षेत  उतीर्ण होऊन फार कमी विद्यार्थी यशस्वीपणे आयएएस, आयपीएस, आयएफएस पदावर जाऊन सनदी आधिकारी होतात, भारतीय प्रशासन सेवेत योगदान देतात, या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याऐवजी सुदर्शन चँनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आक्षेपार्ह विधान करुन धार्मिक द्वेष निर्माण केला आहे.

आयएएस होणारे मुस्लीम विद्यार्थी म्हणजे "शासन व्यवस्थेच्या सर्वात मोठ्या पदावरील मुस्लीमांची घुसखोरी" असा जावई शोध लावून या चँनलवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भातील ट्वीटला तर थेट पंतप्रधान आणि आरएसएसला टँग करण्यात आले. या अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह वर्तनाची दखल घेऊन सनदी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवली तसेच दिल्ली उच्चन्यायालयात याचिका दाखल केली. दिल्ली  उच्च न्यायालयाने या कार्यक्रमाचं प्रसारण रोखणारी नोटीस दिल्यामुळे होऊ घातलेला कार्यक्रम रद्द झाला असला तरी ह्या  बेजबाबदार वर्तनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 
सुरेश चव्हाणके यांनी द्वेषमूलक वक्तव्य करुन धार्मिक तेढ निर्माण केली आहेच शिवाय भारतीय संविधानाचा घोर अवमान केला आहे. 

मुस्लीम सत्यशोधक मंडळ सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या सुदर्शन चँनलचा निषेध करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करीत आहे.  यामुळे मुस्लीम समाजाची जी बदनामी आणि हानी झाली त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. या सुदर्शन चँनलवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने किमान बंदी घालून चँनलच्या अशा वर्तनावर प्रतिबंध करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळ करीत आहे.अशी माहिती मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन  तांबोळी यांनी दिली. 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...