Skip to main content

वेतन कपात करणार्‍या शासन निर्णय विरोधात 28 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन




बार्शी /प्रतिनिधी - आयटक संलग्न सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी वेतन कपात करणार्‍या शासन निर्णया विरूध्द काम बंद अंदोलन होणार आहे. अधिक माहिती अशी की, 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतींची वसूली व उत्तपन्नाची अट बंधनकारक केल्यामुळे त्याचप्रमाणे लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध अद्याप चालू असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांना वसूलीच्या प्रमाणात 50 टक्के आणि 75 टक्के वेतन मिळणार आहे.  म्हणजे 10 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्राच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने किमान वेतनाचे दर पुर्ननिर्धारित करून ते परिमंडळ 3 मधील कर्मचार्यांना 13085 रूपये मान्य केले असले तरी वरील शासन निर्णयामुळे त्याचा लाभ कर्मचार्यांना मिळणार नाही.  एका हाताने देण्याचे नाटक करायचे तर दुसर्या हाताने हिसकावून घ्यायचे या सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संतप्त झाले आहेत.  म्हणून 28 जूलैचा शासन निर्णय रद्द करून शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच करणे आवश्यक आहे.  या प्रमुख माण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 जूलै रोजी अंदोलन केले होते.  आता पुन्हा याच मागण्यासाठी 28ऑगस्ट रोजी महाराष्ट्रव्यापी संप कामबंद आंदोलन करणार असल्याचे जिल्हा संघटनेचे सचिव काॅम्रेड ए.बी.कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवले आहे.  


29 ऑगस्ट रोजी मा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानावर आंदोलन  हे कोरोना महामारीच्या कारणामुळे 14 दिवस मंत्रीमोहदयांना भेटता येत नसल्याने परवानागी नाकारल्याने कोल्हापूर येथील अंदोलन स्थगित करत दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजीचे कामबंद अंदोलन होणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांनी हे अंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन आयटक ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे व सचिव काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...