हुलजंती/अमीर आत्तार - मंगळवेढा तालुका येथील पश्चिम भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून हुलजंती ओळखले जाते. गेली 10 ते 12 वर्षे झाले गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी आवा च्या सव्वा रक्कम घेऊन हुलजंती गावठाण व येथील सरकारी जमिनी लोकांच्या नावाने बेकायदेशिरपणे नावे केले आहेत . गावातील तीस-चाळीस टक्के तरुण सुशिक्षित बेकार असून त्यांनी ग्रामपंचायत कडे व्यवसायासाठी जागेची मागणी करतात .परंतु ग्रामपंचायत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू उदरनिर्वाह करण्यासाठी जागा देत नाही .विचारल्यास गावांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगतात . परंतु गावाबाहेरील नातेवाईक पाहुण यांना मात्र जागा उपलब्ध कशी होते . गावातील काही तरुण ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही जगा देत नसल्याकारणाने जन कल्याण फाउंडेशनच्या वतीने आज रोजी ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले असून निवेदन दिले. यावेळी वेळी सोलापूर जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), ग्राहक मंच तालुका अध्यक्ष अमोल कोरे , युवा नेते मारुती पेटर्गे, हिम्मत पेटर्गे, सिद्धेश्वर पेटर्गे, सुनील सोमुत्ते, दशरथ पेटर्गे, आदी ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत हुलजंती यांना निवेदन आहे व सुशिक्षित बेकारांना न्याय मिळवून द्यावा असे आव्हान केले आहे.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment