Skip to main content

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून ई -पास ची होळी




अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून  ,ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला

पंढरपूर/-नामदेव लकडे - महाराष्ट्र राज्य सरकारने एसटी महामंडळाची बस प्रवासींना विना पास राज्यभरातून प्रवास करण्यासाठी सुरू केली व खाजगी वाहनधारकांवर ई पास ची सक्ती आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आनली एकीकडे प्रशासन कोरोणा पासून वाचण्याचे संदेश देत आहे व त्यावर अनेक उपाययोजना ही करत आहे आणि एकीकडे अनोळख्या व्यक्तिबरोबर व लक्षणे माहीत नसलेल्या व्यक्ति बरोबर प्रवास करण्यास परवानगी देत आहे आणि लॉकडाऊन मुळे चार महिने घरातच राहणाऱ्या सदस्यांबरोबर प्रवास करण्यास बंधने घालत आहे.

एकीकडे सरकार आपला महसूल (तिजोरी) भरण्यासाठी जनतेचा जीव धोक्यात घालत आहे आणि एकीकडे गोरगरिबांना करून खाण्यासाठी बंधने आणून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणत आहे.या वाहन धारकांना धंदे नसल्याने यांनी बँका व फायनान्स वाल्यांचे हप्ते कसे फेडायचे आज गाडी चा व्यवसाय करून खाण्यावर तगादा लावून त्यांच्या गाड्या ओढून नेत आहेत अश्या गोर गरीब वाहनधारकांनी जगावे की मरावे हा प्रश्न या वाहनधारकांवर येत असताना या राज्य सरकारने याचे उत्तर यांना द्यावे.

आज अखिल भारतीय छावा संघटनेकडून या सरकारचा आत्ता तरी ई पास जाळून निषेध करण्यात आला आहे जर यापुढे ही खाजगी वाहनांवरील ई पास ची सक्ती त्वरित बंद न केल्यास या ही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राज्य सरकार ला या वेळी देण्यात आला यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व खाजगी वाहन धारक चालक मालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...