डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा -राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक पवार यांची पालकमंत्री यांच्या कडे मागणी
पंढरपूर/ नामदेव लकडे -मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता डाळिंब पिकामुळे नवीन एक संकट ओढवले आहे.या संकटाशी सामना करणाऱ्या या शेतकऱ्यांना आता शासनाने त्वरित मदत घ्यावी अशी मागणी पंढरपूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड दीपक पवार यांनी सोलापूर जिल्ह्यचे पालकमंत्री ना.दत्तामामा भरणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सध्या डाळिंब पिकावर तेल्या आणि कुजवाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. यामुळे या डाळिंब फळबागाचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी दीपक पवार यांनी केली आहे.

Comments
Post a Comment