बार्शी /अब्दुल शेख - कै.सुखदेव शिवाजी चिकणे यांच्या 21 व्या पुण्य स्मरण निमित्त व कोवीड 19 च्या महामारी ने रक्ताचा तुटवडा आहे ,या निम्मीत्ताने गूळपोळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे आयोजन भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय गुळपोळी ,भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था गुळपोळी, नेहरू युवती मंडळ गुळपोळी,नेहरू युवा मंडळ गुळपोळी,भैरवनाथ ग्रामविकास मंडळ गुळपोळी,शिवतेज मंडळ गुळपोळी यांच्या वतीने करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उदघाटन सुर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य धिरज श्रीरंग डोईफोडे व जी एस टेलर चे संचालक गुलाब हुसेन शेख यांचे हस्ते करण्यात आले. सदर रक्तदान शिबीर मध्ये महिलांनी उत्साहित होउन स्वयंस्फुरतीने रक्तदान केले. या शिबीरात 32 रक्तदाते यांनी रक्तदान केले.शिबीरामध्ये रक्तदाते यांना विस लिटर थंड पाणी ठेवणयाचा जार चा भेट म्हणुन देण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थिति अक्षय चंद्रकांत सावंत ,सुनिता चिकणे , सौरभ कापसे , राजेंद्र गोरे , गणेश लंगोटे प्रहार संघटना उपाध्यक्ष बार्शी तालुका व पोलीस पाटिल बाळकृष्ण पिसे , अतुल चिकणे , शिवाजी चिकणे मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे व विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विक्रांत बाळराजे राजन पाटील यांनी सदर कार्यक्रमासाठी फोन वरून शुभेच्छा दिल्या ,अशी माहिती सूर्यकांत चिकणे यांनी दिली. कार्यक्रम पार पाडण्यासाठी बाबू विठ्ठल चिकणे व अक्षय चंद्रकांत सावंत सौरभ कापसे , बाळू रावसाहेब चौधरी , सिध्देशवर माळी , सुरज पवार , माधवी मिरा पवार , सौ आरे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment