उस्मानाबाद /अक्षय वायकर - अर्जुन पुरस्कार प्राप्त सारीका काळे यांचा वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रवक्ता राम गायकवाड , जिल्हा कार्यकारिणी सदस्य अंकुश लोखंडे(माजी सैनिक)बाबासाहेब जानराव , आर. एस.गायकवाड ,सचिन लोखंडे ,युवा नेते अंकोल वाघमारे , अनुराधा लोखंडे ,ज्योती लोखंडे ,सुदर्शन बनसोडे ,कवी-गोविंद भंडारे ,जगन्नाथ वाघमारे ,राहुल कांबळे ,सुरज बिराजदार इत्यादि उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment