राजेशाही थाटात बजावला लोकशाहीचा अधिकार मंगळवेढा/विशेष प्रतिनिधी - पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आज पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले . या मतदार संघातील मारापुर ता. मंगळवेढा येथील कुणाल भागवत माने (वय-३५ )यांनी माने फार्म पासुन मारापुर मतदान केंद्र पर्यंत 8 कि.मी घोड्यावर येवुन मतदानाचा हक्क बजावला. लोप पावत चाललेल्या दळणवळणाच्या व्यवस्थेचा छंद म्हणून त्यांनी आपल्या फार्म मध्ये ४ प्रकारच्या जातीवंत घोड्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे माने हे डॉक्टरपेशा असणाऱ्या कुटुंबातील आहेत.पुण्यासारख्या विकसित भागामध्ये वास्तव्यास असुन ही ग्रामीण भागाची आपली नाळ कायम जोडली आहे.
ABS News Marathi Latest News in Marathi, मराठीतील टॉप हेडलाईन्स, Breaking News in Marathi, आजच्या मराठी बातम्या, मराठी लेटेस्ट न्यूज, आजच्या महत्त्वाच्या बातम्या, लेटेस्ट मराठी न्यूज - ABS News Marathi ABS News Marathi: Latest Marathi News Headlines - news covers Latest Marathi News including Maharashtra, India, Solapur, ahmednagar Mumbai, Pune & all