Skip to main content

बार्शीतील कोरोना रुग्णासंख्या आटोक्यात येण्याकरिता जनता कर्फू ची गरज

 

फोटो- प्रतीकात्मक

बार्शी तालुक्यात व इतर शेजारील तालुक्यातून येणारी रुग्णसंख्या पाहता उपलब्ध आरोग्य सुविधा अपुरी

बार्शी / प्रतिनिधी - राज्य शासनाने त्याचबरोबर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी ब्रेक द चेन”च्या संदर्भाने 14 तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून आदेश निर्गमित केले आहेत. आदेश निर्गमित केल्यानंतर बार्शी शहरातील परिस्थिती पाहता ज्या आस्थापना दुकाने चालू राहिलेले आहेत. तिथे आणि शहरात नागरिकांना कुठल्याही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही. लोक बिनधास्त फिरत आहेत असे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर जे शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रं. 3 इ मध्ये स्पष्टपणाने ,"आवश्यकता असल्यास काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाने बंद केल्याचे घोषित करावे". असे नमूद आहे. याचा आधार घेऊन बार्शी शहर व तालुक्यातील स्थानिक प्रशासनाने वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता मार्च 2020 प्रमाणे कडक निर्बंधासह जनता कर्फू करावा , अशी मागणी बार्शी नगरपालिका विरोधी पक्ष नेते  नागेश यांनी अक्कलकोटे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.

 

पत्रात पुढे म्हटले आहे की सद्यस्थितीत बार्शी मध्ये एकूण 409 डेडिकेटेड कोव्हीड सेंटरमधील बेडची उपलब्धता आहे. यामध्ये जगदाळे मामा हॉस्पिटल 120 ,सुश्रुत हॉस्पिटल (डॉ.अंधारे ) संख्या 80 ,कॅन्सर हॉस्पिटल 40सोमानी हॉस्पिटल 35, करगल हॉस्पिटल 35 ,चौधरी हॉस्पिटल 39 , पाटील हॉस्पिटल 15 , भगवंत डेडिकेटेड सेंटर 20 , शहा हॉस्पिटल 15 ग्रामीण रुग्णालय 10 या सर्व 10 डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या फक्त 205 आहे. तसेच व्हेंटिलेटर ची संख्या  फक्त 13 आहे आणि एच एफ एन व ओ ची संख्या फक्त 13 आहे . त्याचबरोबर शासकीय  सीसीसी अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल या ठिकाणी 50 श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी 100आयटीआय या ठिकाणी 90 ,तर प्रस्तावित छत्रपती भवन येथे 50 या प्रमाणे बेड ची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर पांगरी येथे 50 बेड संख्यासह बार्शी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येकी 50 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. बार्शी शहरात आजूबाजूच्या  माढा , मोहोळ ,  परंडा,  भूम , वाशी , तुळजापूर , कळंब या सर्व तालुक्यातील येणारी रुग्ण संख्या लक्षात घेता ही उपलब्ध असणारी आरोग्य व्यवस्था अत्यंत अपुरी आहे हे वास्तव आहे.


एकूणच ही संपूर्ण परिस्थिती पाहता बार्शी शहर व तालुक्यातील चित्र अत्यंत विदारक ,भीतीदायक व गंभीर आहे. नेहमीप्रमाणे शहरात  बिनधास्त फिरणारे  लोक तसेच अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता या संपूर्ण परिस्थितीवर कोव्हीड रुग्ण संख्या आटोक्यात येण्याऐवजी त्यामध्ये वाढ होण्याचाच धोका जास्तीचा संभवत आहे. कोरोना रुग्णावर  होणारा खर्च , उपलब्ध न होणारी आरोग्य व्यवस्थारेमडिसिव्हर  इंजेक्शन साठी होणारी पळापळ बेड उपलब्धतेसाठी होणारी पळापळलाखो रुपये खर्चूनही होणार्‍या मरणयातना किंवा मरण यामुळे होणार आर्थिक मानसिक त्रास पाहता कडक लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू ची अत्यंत ,नितांत गरज निर्माण झालेली आहे. तरी ब्रेक द चेन मधील मुद्दा क्रमांक 3 याचा आधार घेऊन स्थानिक  प्रशासनाने बार्शी शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी अथवा जनता कर्फ्यू चा निर्णय घ्यावा,अशी मागणी बार्शी नगरपालिका विरोधी पक्ष नेते  नागेश यांनी अक्कलकोटे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे तिला समजल की ती स्वतःच त्यातून बाहेर पडेल

                                                                                             आज जागतिक मासिक पाळी दिन... सकाळी सकाळीच घरातीलच एक किस्सा आठवला. सध्या लॉकडाउनमुळे घरा घरात पापड्या कुरवडया बनवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत... तसाच कार्यक्रम काही दिवसांपूर्वी आमच्याही घरी चालू होता. घरात मासिक पाळी येणाऱ्या आम्ही तिघी. आई ,वहिनी आणि मी. त्यातही आईची पिशवी काढून टाकल्याने राहिलो आम्ही दोघीच वहिनी आणि मी... घरात एकीचे झाले  की एकीचे चक्र सुरू असते. त्यामुळे एकदा अशीच मजा घरात घडली. गेल्या महिन्यात आईने घरात कुरवडया बनविण्याचा घाट घातला, त्याही दोन टप्यात. पहिल्या टप्प्यातल्या कुरवड्या व्यवस्थित झाल्या अगदी कोणत्याही अडचणी व तक्रारीशिवाय . परंतु दुसऱ्या टप्प्यात मात्र आमच्या वहिनीबाईंची पाळी होती. त्यादिवशी सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि दत्ता द...